जगाची लोकसंख्या ८ ट्रिलियनपेक्षा जास्त आहे. मात्र, काही लोक असे आहेत जे जगाची लोकसंख्या वेगाने वाढवण्यासाठी आपले पूर्ण योगदान देत आहेत. अशाच एका कारणामुळे जर्मनीतील एका महिलेची कहाणी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. याचे कारण म्हणजे ती स्त्री आई बनली आहे. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? खरं तर या महिलेने वयाच्या ६६ व्या वर्षी आपल्या दहाव्या मुलाला जन्म दिला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेने तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय नैसर्गिकरित्या बाळाला जन्म दिला आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अलेक्झांड्रा हिल्डेब्रँड या महिलेने १९ मार्च रोजी बर्लिनमधील चॅरिटे रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे मुलाला जन्म दिला. बाळाचे वजनही नॉर्मल होते आणि महिलेची तब्येत खूप चांगली आहे. बर्लिनमध्ये म्युझियम चालवणाऱ्या हिल्डेब्रॅंटने पाच दशकांपूर्वी म्हणजे ७० च्या दशकाच्या उत्तरार्धात आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. तेव्हापासून तिने नऊ मुलांना जन्म दिला आहे. या सर्वांचा जन्म सी-सेक्शनच्या माध्यमातून होतो.
या महिलेच्या मुलांबद्दल बोलायचे झाले तर ४६ वर्षीय स्वेतलाना ही तिची सर्वात मोठी मुलगी आहे. आर्टियम ३६ वर्षांचा आहे. एलिझाबेथ आणि मॅक्सिमिलियन १२ वर्षांचे आहेत. अलेक्झांड्रा १०, लिओपोल्ड ८, अॅना ७, मारिया ४ आणि कॅथरिना २ वर्षांची आहे. मूल वाढवण्यासाठी मोठं कुटुंब असणं गरजेचं आहे, असं हिल्डेब्रॅंट यांचं मत आहे. "मोठं कुटुंब हे केवळ अप्रतिम नसतं, तर मुख्य म्हणजे मुलांच्या योग्य संगोपनासाठी ते महत्त्वाचं असतं. "
या वयात गरोदरपणाचे व्यवस्थापन करण्याविषयी विचारले असता हिल्डेब्रँड म्हणाली की, ती चांगली जीवनशैली जगते. याशिवाय त्यांनी आजपर्यंत कोणत्याही गर्भनिरोधकाचा वापर केलेला नाही. "मी खूप निरोगी खाते, नियमित एक तास पोहते, दोन तास धावते, धूम्रपान करत नाही आणि मद्यपान करत नाही. मी कधीही गर्भनिरोधक वापरले नाही. आपण लोकांना अधिक मुले होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे!
संबंधित बातम्या