german man dies on thailand germany lufthansa flight : थायलंडहून जर्मनीला जाणाऱ्या लुफ्थान्सा विमानात एक खळबळजनक घटना घडली. एका प्रवाशाने तोंडातून आणि नाकातून रक्ताच्या उलट्या केल्या. तसेच त्याला खोकलाही आल्याने विमानात खाली खिडक्यांवर रक्त उडाले. दरम्यान, काही वेळातच त्या प्रवाशाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
एक ६३ वर्षीय जर्मन व्यक्ती हा थायलंडहून जर्मनीला जाणाऱ्या लुफ्थान्सा विमानात प्रवास करत होता. प्रवास करतांना अचानक त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्ताचा मोठा स्त्राव सुरू झाला. या व्यक्तीने इतक्या रक्ताच्या उलट्या केल्या की ते विमानाच्या भिंतींवर आणि खली पसरले. सतत रक्ताच्या उलट्या झाल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हे पाहून विमानात गोंधळ उडाला. रिपोर्ट्सनुसार, बँकॉकहून फ्लाइटमध्ये बसलेला जर्मन माणूस आजारी होता. त्याला सतत घाम येत होता आणि तो खूप वेगाने श्वास देखील घेत होता.
डेली मेलच्या वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. मुळ जर्मनीचा असलेला हा व्यक्ति गुरुवारी रात्री ११.५२ वाजता फिलिपाइन्सहून आपल्या पत्नीसह बँकॉकहून फ्लाइटमध्ये चढला. म्युनिकला निघालेल्या या जोडप्यासाठी हा प्रवास धक्कादायक ठरला. वृद्ध व्यक्ति फ्लाइटमध्ये चढताच त्याला जोरात खोकला येऊ लागला.
त्या व्यक्तीची प्रकृती वेगाने खराब झाल्याने फ्लाइटमधील प्रवासी त्याच्या मदतीला आहे. त्यांनी त्या वृद्ध माणसाला कॅमोमाईल चहा दिला आणि त्याची नाडीही तपासली. परिस्थिती लक्षात घेऊन फ्लाइट कॅप्टनला इमर्जन्सी लँडिंग करण्याचा सल्ला देण्यात आला. कॅप्टनने लगेच फ्लाइट बँकॉकच्या दिशेने वळवली पण उशीर झाला होता. सतत रक्ताच्या उलट्यांमुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
विमान बँकॉकमध्ये उतरताच सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले. त्यानंतर त्यांना इतर विमानांद्वारे आपापल्या स्थळी पाठवण्यात आले. या घटनेनंतर हे विमान रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. काही प्रवाशांचा असा विश्वास आहे की फ्लाइट कर्मचाऱ्यांकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. कारण जेव्हा त्या व्यक्तीला फ्लाइटमध्ये चढताच खोकला येऊ लागला तेव्हा त्यांनी त्याला वैद्यकीय सुविधा द्यायला हवी होती. कदाचित यामुळे त्याचा जीव वाचला असता. पण फ्लाईट अटेंडंट्सनी त्याकडे दुर्लक्ष करून फ्लाइट सोडली.