General Knowledge: सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी नवीन पाहायला मिळते. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक इंस्टाग्राम युजर दोन तरुणींचे जनरल नॉलेज तपासून पाहत आहे. इंस्टाग्राम युजरने तरुणींना सिंह जंगलाचा राजा आहे, पण तो कुठे राहतो, असा प्रश्न विचारतो. यावर तरुणींनी दिलेले उत्तर ऐकून अनेकांना हसू आवरता आले नाही. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
@rajkandaofficial नावाच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत इंस्टाग्राम युजर संबंधित तरुणींना सिंह जंगालाचा राजा आहे, मग तो राहतो कुठे? असा अत्यंत साधा प्रश्न विचारतो. व्हिडिओत डाव्या बाजूला उभा असलेल्या तरुणीला प्रश्न समजत नाही. यामुळे ती प्रश्न पुन्हा विचारण्यास सांगते. इंन्स्टाग्राम युजर प्रश्नाची पुनरावृत्ती करतो. यावर तरुणी उत्तर देते की, सिंह हा जंगलातच राहतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडिओुवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. ज्या लोकांचे हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे, त्यांनीच या प्रश्नाचे योग्य उत्तर दिल्याचे समजत आहे. एका युजरने या प्रश्नाचे उत्तर देताना पाण्यात राहतो, अशी कमेंट केली. यावर दुसरा युजर म्हणाला की, ‘सिंह गुहेत राहतो, पाण्यात नाही! पाण्यात मगर राहते.’
महत्त्वाचे म्हणजे, व्हिडिओतील तरुणींना मूळात प्रश्नच समजला नाही, असे दिसत आहे. कारण त्यांना खूप वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आला. सिंह जंगलाचा राजा आहे, असे त्याने तरुणींना सांगितले आणि मगर कुठे राहते? हा प्रश्न विचारला. पण तरुणींनी घाई गडबडीत प्रश्न समजून घेण्याआधीच उत्तर दिले, जे चुकीचे आहे.