iPhone यूजर्ससाठी खुशखबर.. भन्नाट माहितीचा खजिना देणारे Gemini App झाले लाँच झाले
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  iPhone यूजर्ससाठी खुशखबर.. भन्नाट माहितीचा खजिना देणारे Gemini App झाले लाँच झाले

iPhone यूजर्ससाठी खुशखबर.. भन्नाट माहितीचा खजिना देणारे Gemini App झाले लाँच झाले

Nov 15, 2024 04:00 PM IST

Google Gemini App : टेक दिग्गजकंपनी Google ने अखेर iOS यूजर्ससाठी आपले Gemini अ‍ॅप लाँच केले आहे. iPhone यूजर्स आता हे अ‍ॅप स्टोरवरून डाउनलोड करू शकतात.

iPhone यूजर्ससाठी खुशखबर
iPhone यूजर्ससाठी खुशखबर

गुगल आपल्या यूजर्ससाठी काही ना काही नवीन आणत असते. आता Google आपले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) टूल Gemini  आणखी मजबूत करणार आहे. लवकरच गुगल वापरकर्ते "Gemini Live" नावाच्या एआय असिस्टंट सोबत संवाध साधून आपले डॉक्यूमेंट्स आणि फाइल्स एडिट करू शकणार आहेत. 

टेक दिग्गज कंपनी  Google ने अखेर iOS यूजर्ससाठी आपले Gemini अ‍ॅप  लाँच केले आहे. iPhone यूजर्स आता हे अ‍ॅप  स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. यूजर्स Google च्या पर्सनल AI असिस्टंटचा वापर मोफत घेऊ शकतात. 

Google चे म्हणणे आहे की, iOS  किंवा वेब ब्राउजरवर Google अ‍ॅपच्या माध्यमातून जेमिनीचा वापर करण्याबरोबरच  आयफोन यूजर्संना सुलभ पद्धतीने अशा सुविधा मिळू शकतात, ज्यामुळे नवीन गोष्टी शिकणे, रचनात्मकता व उत्पादकता वाढवण्यास मदत होते. 

याचे एक फीचर Gemini Live आहे, जे यूजर्सना AI असिस्टंटसोबत संवाद साधण्यास मदत करते.  AI असिस्टंटशी प्रश्न विचारू शकते. यूजर्स १० वेगवेगळ्या आवाजांपैकी एक निवडून त्याचा वापर करू शकते. iOS वर Gemini Live आता १० हून अधिक भारतीय भाषा उपलब्ध आहेत आणि येणाऱ्या काळात आणखी भाषा उपलब्ध होणार आहेत.

त्याचबरोबर Gemini कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यास मदत करू शकते. यासाठी यूजर्स कोणत्याही विषयाबाबत प्रश्न विचारू शकतात. हे विद्यार्थ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. कारण हे त्यांच्या अभ्यासात मदत करू शकते. यूजर्सच्या शिकण्याच्या शैलीच्या आधारावर मार्गदर्शन करू शकते.

इतकेच नाही तर एक व्यक्ति एक जटिल समस्याही याच्यामाध्यमातून सोडवू शकते. त्याचसोबत इमेजन ३, जे Google चे इमेज जनरेशन मॉडल आहे, ते यूजर्ससाठी उपलब्ध आहे. याच्या माध्यमातून ते टेक्स्ट विवरण गतीने AI  इमेजमध्ये बदलू शकतात. तुम्ही व्यक्तिगत किंवा व्यावसायिक उपयोगासाठी एखादी इमेज शोधत असाल तर इमेजन ३  ची फोटोरियलिज्म आणि अचूकता विचारांना जिंवत करू शकते.

Gemini तुमच्या पंसतीच्या Google अ‍ॅप शी जोडला जाऊ शकतो. एक्सटेंशनसोबत हे तुमच्या दैनंदिन उपयोगासाठी असणाऱ्या Google अ‍ॅपमधून प्रासंगिक माहिती शोधून देऊ शकते. iOS वर जेमिनी लाइव्हची उपलब्धता त्या iPhone यूजर्ससाठी चांगली बातमी आहे, ज्यांना Apple इंटेलिजेंस फीचर मिळाले नव्हते.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर