google ai chatbot : गुगलने आपल्या जेमिनी एआय चॅटबॉटबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गुगलने सांगितले की जेमिनी AI ला या वर्षीच्या जागतिक निवडणुकांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यापासून रोखणार आहेत. निवडणुकीत या तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला, जेव्हा जनरेटिव्ह AI प्रगती, इमेज आणि व्हिडिओ जनरेशनसह, वापरकर्त्यांमध्ये चुकीची माहिती आणि फेक न्यूजबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
यामुळे हे धोके लक्षात घेऊन सरकार या तंत्रज्ञानाचे नियमन करण्याचा विचार करत आहेत. गुगलच्या अपडेटनंतर, जेमिनीला जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीबद्दल प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी उत्तर दिले, 'मी अजूनही या प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे ते शिकत आहे. तुम्ही या प्रश्नाचे उत्तर गुगल सर्च करून पाहा.
गुगलने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जेमिनी एआय चॅटबॉटबाबत हा निर्णय घेतला होता. अमेरिकेत याची घोषणा करताना गुगलने हे अपडेट निवडणुकीपूर्वी लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. कंपनीच्या प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले की, '२०२४ मध्ये जगभरात होणाऱ्या अनेक निवडणुकांच्या तयारीसाठी आणि भरपूर सावधगिरी बाळगून, आम्ही जेमिनी AI प्रतिसाद देतील अशा प्रकारच्या निवडणूक संबंधित प्रश्नांवर बंदी आणणार आहोत. अमेरिका (युनायटेड स्टेट्स) व्यतिरिक्त या वर्षी दक्षिण आफ्रिका आणि भारतासह अनेक मोठ्या देशांमध्ये राष्ट्रीय निवडणुका होणार आहेत.
भारताने टेक कंपन्यांना सार्वजनिकरित्या विश्वासू किंवा अंडर-ट्रायल एआय टूल्स आणण्यापूर्वी सरकारची मान्यता घ्यावी लागणार आहे. तसेच निवडणुकीसंदर्भात चुकीची उत्तरे देण्याची शक्यता असल्याने प्रतिबंध लावले जाणार आहे. AIच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या लोकांच्या काही ऐतिहासिक चित्रणांमध्ये चुका झाल्यामुळे Google ची AI उत्पादनांची आता तपासणी होणार आहेत.
याच कारणामुळे गेल्या महिन्याच्या अखेरीस गुगलला चॅटबॉटचे इमेज जनरेशन फीचर बंद करावे लागले होते. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी याबाबत सांगितले होते की, कंपनी त्या त्रुटी दूर करण्यासाठी काम करत आहे. पिचाई यांनी चॅटबॉटच्या प्रतिसादांना पक्षपाती तसेच ते स्वीकारण्या जोगे नसल्याचे म्हटले होते.
संबंधित बातम्या