पुरुषांसोबत संबंध ठेवायचा, मन भरलं की मारून टाकायचा! मृतदेहावर लिहायचा ‘धोकेबाज’; ११ खून करणाऱ्या 'गे' किलरची कहाणी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पुरुषांसोबत संबंध ठेवायचा, मन भरलं की मारून टाकायचा! मृतदेहावर लिहायचा ‘धोकेबाज’; ११ खून करणाऱ्या 'गे' किलरची कहाणी

पुरुषांसोबत संबंध ठेवायचा, मन भरलं की मारून टाकायचा! मृतदेहावर लिहायचा ‘धोकेबाज’; ११ खून करणाऱ्या 'गे' किलरची कहाणी

Jan 07, 2025 01:51 PM IST

Punjab Gay serial killer : पंजाबमध्ये एका गे सिरियल किलरला अटक करण्यात आली आहे. त्याने आता पर्यंत ११ जणांची हत्या केल्याचं उघड झालं आहे.

पुरुषांसोबत ठेवायचा संबंध, मन भरल्यावर ११ जणांची केली हत्या, मृतदेहावर लिहायचा 'धोकेबाज', 'गे' किलरची धक्कादायक कहाणी
पुरुषांसोबत ठेवायचा संबंध, मन भरल्यावर ११ जणांची केली हत्या, मृतदेहावर लिहायचा 'धोकेबाज', 'गे' किलरची धक्कादायक कहाणी

Punjab Crime Gay serial killer : तुम्ही अनेक भयानक, रानटी गुन्हेगारांच्या गोष्टी ऐकल्या असतील. त्यांच्या अनेक क्रूर गोष्टी देखील तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, पंजाबमध्ये पोलिसांनी एका क्रूर गे सीरियल किलरला अटक केली आहे. या 'गे' किलरने तब्बल ११ जणांसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून त्यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. हत्या केल्यानंर आरोपी हा त्यांची माफी मागून त्यांच्या अंगावर 'धोकेबाज' लिहायचा.

राम सरूप असे या गे किलरचे नाव आहे. राम सरूप हा आधी त्याच्या गाडीने लोकांना लिफ्ट द्यायचा. या नंतर त्यांच्याचे शारीरिक शोषण करून लुटूमार करायचा व यानंतर त्यांची हत्या करायचा. तो समलिंगी असल्याचे उघड होईल या भीतीने ताने या हत्या केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे.

१८ महिन्यांत केले ११ जणांचे खून

होशियारपूर जिल्ह्यातील चौरा गावातील रहिवासी असलेला राम सरूप उर्फ ​​सोढी (वय ३३)ने ट्रक चालक, मजूर किंवा रस्त्याच्या कडेला चहा विकणारे यांना लक्ष्य करत त्यांची हत्या केली आहे. त्याने १८ महिन्यांत ११ जणांची हत्या केल्याचं उघडं झालं आहे. यात मृतांमध्ये एका स्थानिक लोकप्रतिनिधीच्या भावाचाही समावेश आहे. सरूप हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचं उघडं झालं आहे.

पत्नी सोडून गेली

सोढी हा समलैंगिक असला तरी त्याचं लग्न झालं होतं. त्याच्या समलैंगिक असण्याबद्दल कळाल्यामुळेच पत्नीने त्याला सोडलं होतं. त्याला तीन मुले आहेत. तो नशेच्या आहारी गेल्याने त्याच्या कुटुंबाने दोन वर्षांपूर्वी त्याला सोडून दिले होते. तो कारमध्ये लोकांना लिफ्ट द्यायचा. मग त्यांना लुटायचा आणि त्याला विरोध केला तर त्यांना मारून टाकायचा. बरेचदा तो महिलेच्या वेषात असायचा. टोल नाक्यावर एका ३७ वर्षांच्या एका चहा विक्रेत्याची जेव्हा त्याने हत्या केली, तेव्हा त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे सापडल्यानंतर रूपनगर जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली. .

मृतदेहाच्या पायाला हात लावून माफी मागायची

सरूप हा अतिशय थंड डोक्याने हत्या कारायचा. हत्या केल्यावर त्याला पश्चाताप व्हायचा. खून केल्यावर तो त्यांच्या पाया पडायचा आणि क्षमा मागायचा.

पाठीवर लिहायचा धोकेबाज

राम सरूप हा लोकांची हत्या करून त्यांच्या पाया पडायचा. यानंतर त्यांच्या पाठीवर ‘धोकेबाज’ असं लिहायचा. फतेहगड साहिब आणि होशियारपूरमध्ये त्याने याच पद्धतीने हत्या केल्याचं कबुल केलं आहे. तो आधी गळा दाबायचा. यानंतर विटेने डोक्यावर प्रहार करून हत्या करायचा. त्यानं मारलेल्या लोकांमध्ये लष्करातील एक निवृत्त कर्मचारीही समाविष्ट आहे. लष्करातून निवृत्त झाल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून तो काम करत होता. त्याला मारून आरोपीनं त्याच्या पाठीवर धोकेबाज असं लिहिलं होतं.

राम स्वरूप हा सफाई कामगार होता. त्याने हायस्कूल सोडले. २००५ मध्ये तो दुबईला गेला आणि तेथे त्याने मजूर म्हणून काम केले. २००६ मध्ये तो पुन्हा भारतात परतला आणि होशियारपूरमध्ये मजूर म्हणून काम करू लागला. यानंतर त्याचे लग्न झाले. २०२२ मध्ये, त्याची पत्नी आणि मुलाने त्याला सोडून दिले. त्याच्या विकृत मानसिकतेमुले त्याने ११ जणांचे संसार उद्ध्वस्त केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर