सीएनजी गॅस टँकरच्या भीषण स्फोटात ४० वाहने भस्मसात; ५ जणांचा होरपळून मृत्यू, २५ जण गंभीर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सीएनजी गॅस टँकरच्या भीषण स्फोटात ४० वाहने भस्मसात; ५ जणांचा होरपळून मृत्यू, २५ जण गंभीर

सीएनजी गॅस टँकरच्या भीषण स्फोटात ४० वाहने भस्मसात; ५ जणांचा होरपळून मृत्यू, २५ जण गंभीर

Dec 20, 2024 11:27 AM IST

Jaipur Gas Tanker Blast News : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. अजमेर रोडवर सीएनजी टँकरचा स्फोट झाला. झाल्याने अनेक वाहनांना आग लागली. तर ५ जण ठार झाले आहे.

सीएनजी गॅस टँकरच्या भीषण स्फोटात ४० वाहने भस्मसात; ५ जणांचा होरपळून मृत्यू, २५ जण गंभीर
सीएनजी गॅस टँकरच्या भीषण स्फोटात ४० वाहने भस्मसात; ५ जणांचा होरपळून मृत्यू, २५ जण गंभीर

Jaipur Tanker Blast News in Marathi : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. अजमेर रोडवर सीएनजी टँकरचा स्फोट होऊन सुमारे ४० वाहनांना आग लागली. या दुर्घटनेत नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक वाहने भस्मसात झाली आहे.  आतापर्यंत या घटणत ५  जणांचा जळून मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर जवळपास २५ जण गंभीर असून त्यांची  प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अजमेर रोडवरील भांक्रोटा भागात हा अपघात झाला. गॅस टँकरमध्ये झालेल्या स्फोटामुळे बस, ट्रक, कार सह पेट्रोल पंपासह अनेक वाहनांना आग लागली.

या घटनेची माहिती मिळताच  जयपूरचे जिल्हाधिकारी जितेंद्र सोनी घटनास्थळी जात बचावकार्याबाबत सूचना केल्या आहेत. सोनी यांनी सांगितले की, या घटनेत ४० वाहने जळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. तर  जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली असून एकाच वेळी अनेक वाहनांना आग लागल्याची माहिती मिळाली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या होत्या. 

सिएनजी गॅसने भरलेला टँकर दुसऱ्या ट्रकला धडकल्याची प्राथमिक माहिती आहे. धडक झाल्यावर सीएनजी टँकरचा मोठा स्फोट झाला. यावेळी या ठिकाणी अनेक वाहने होते. हा स्फोट इतका भीषण होता की, एक बस, अनेक ट्रक, कार, दुचाकीसह अनेक वाहनांना आग लागली. ही जवळ असलेल्या पेट्रोल पंपाला देखील आग लागली. यामुळे आगीची तीव्रता आणखी वाढली. अचानक झालेल्या स्फोटामुळे व आगीमुळे लोकांना पाळण्याची संधी देखील मिळाली नाही. त्यामुळे अनेक जण जळाले.

एसएमएस मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. दीपक माहेश्वरी यांनी सांगितले की, आतापर्यंत चार मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. सुमारे २५ जण आयसीयूमध्ये दाखल आहेत. आणखी लोकांना आणले जात आहे. सुमारे १५ जण ८० टक्के भाजल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही एसएमएस रुग्णालयाला भेट दिली आणि जखमींवर उपचार केले जात आहे.

जयपूर-अजमेर राष्ट्रीय महामार्गावर गॅस टँकरला लागलेल्या आगीत नागरिकांचा मृत्यू झाल्याची दु:खद बातमी ऐकून व्यथित झालो आहे. घटनेची माहिती मिळताच एसएमएस रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना तातडीने आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊन जखमींची योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे. प्रशासनाकडून वेगाने बचावकार्य सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन विभाग जखमींना तातडीने सेवा देत आहेत, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत दिली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर