बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा मास्टरमाइंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतील कॅलिफोर्नियात अटक
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा मास्टरमाइंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतील कॅलिफोर्नियात अटक

बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा मास्टरमाइंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतील कॅलिफोर्नियात अटक

Nov 19, 2024 11:04 AM IST

lawrence bishnoi brother anmol arrested in america: गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनमोलला कॅलिफोर्निया पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सलमान खानला धमक्या व बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा मास्टरमाइंड लॉरेन्सचाभाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेतील कॅलिफोर्नियात अटक
सलमान खानला धमक्या व बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा मास्टरमाइंड लॉरेन्सचाभाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेतील कॅलिफोर्नियात अटक

lawrence bishnoi brother anmol arrested in america : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनमोलला कॅलिफोर्नियातून ताब्यात घेण्यात आलं आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी अनमोल हा आपल्या देशात असल्याची माहिती भारतीय तपास अधिकाऱ्यांना दिली होती, त्यानंतर मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी त्याच्या प्रत्यार्पणाचा प्रस्ताव पाठवला होता. आता कॅलिफोर्निया पोलिसांनी कारवाई करत अनमोलला अटक केली आहे. अनमोल हा सलमान खानला धमकी देण्यात व त्याच्या घरावर हल्ला घडवून आणणारा मास्टर माइंड आहे. तर मुंबईतील बाबा सिद्दीकी प्रकरणात देखील त्याचा हात आहे.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणासह काही हायप्रोफाईल गुन्ह्यांमध्ये अनमोल बिश्नोईचे नाव आरोपी म्हणून समोर आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नुकतेच अनमोल बिश्नोईच्या अटकेची माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. एनआयएने २०२२ मध्ये दाखल झालेल्या दोन प्रकरणांमध्ये अनमोलविरोधात आरोपपत्र ही दाखल केले आहे.

याशिवाय १४ एप्रिल रोजी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातही अनमोल बिश्नोईचे नाव समोर आले होते. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांना आरोपी म्हणून दाखवले आहे. या प्रकरणी अनमोलविरोधात लुकआऊट नोटिस देखील जारी करण्यात आली होती.

लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई हे दोघेही राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आरोपी आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक मोठा नेताही बिश्नोई टोळीच्या रडारवर होता, अशी माहिती या खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी दिली. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर बिश्नोई टोळीने श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील गुन्हेगार आफताब पूनावाला याच्या हत्येचा कट आखल्याची देखील माहिती आहे. या बाबतचा खुलासा तिहार तुरुंग प्रशासनाने नुकताच केला होता, त्यानंतर आरोपी आफताबच्या भोवतालची सुरक्षा वाढवण्यात आली होती. गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही मोक्का न्यायालयात याचिका दाखल करून फरार गुन्हेगार अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती.

 

 

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर