gangster kala jathedi wedding lady don madam minz : दहशतवादी आणि गँगस्टर संदीप उर्फ काला जठेडी आणि त्याची गर्लफ्रेंड लेडी गँगस्टर अनु अनुराधा चौधरी उर्फ 'मॅडम मिंज' आज विवाहबंधनात अडकणार आहेत. दिल्ली पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात आणि बेयोनेटमध्ये होणाऱ्या या लग्नासाठी दिल्लीतील मतियाला येथील संतोष गार्डन बँक्वेट हॉल बुक करण्यात आला आहे. अत्यंत सुरक्षित असलेल्या या बँक्वेट हॉलच्या चारही बाजूने पोलिसांनी आणि कमांडोची सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. एवढेच नाही तर टेहळणीसाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. या सोबतच राष्ट्रीय तापस यंत्रणाही या हाय प्रोफाइल आरोपींच्या लग्नावर नजर ठेवणार आहेत.
तिहार तुरुंगापासून सात किलोमीटर अंतरावर संतोष गार्डन बँक्वेट हे लग्नस्थळ आहे. या बँक्वेट हॉलच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसवण्यात आले असून या सोबतच बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये एके-४७ सारख्या शस्त्रांनी सुसज्ज दिल्ली पोलिसांचे स्वात कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. श्वानपथक आणि सीसीटीव्ही कॅमेरेही या ठिकाणी लावण्यात आले आहेत. एवढेच नाही तर या लग्नाला येणाऱ्या सर्व पाहुण्यांची कडक तपासणी करण्यासोबतच त्यांच्यावर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. पोलिसांनी सर्व नातेवाईक आणि वेटर्सना खास ओळखपत्रेही दिली आहेत.
वधू आणि वर दोघेही अंडरवर्ल्ड डॉन असल्यामुळे हे लग्न चर्चेचा विषय ठरले आहे. दोघांविरुद्ध खून, अपहरण, दरोडा, खंडणी, कॉन्ट्रॅक्ट किलिंग असे अनेक गुन्हे आहेत. या लग्नात घातपात होण्याची शक्यता असल्याने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी लग्नाच्या मिरवणुकीत त्यांच्या सुरक्षेत व्यस्त राहणार आहेत. गँगस्टर काला जठेडीला त्याची गर्लफ्रेंड लेडी डॉन अनुराधा चौधरीसोबत लग्न करण्यासाठी कोर्टाने ६ तासांचा पॅरोल दिला आहे. लग्नाच्या सुरक्षेसाठी २५० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
लग्नात टोळीयुद्धासारखी कोणतीही घटना टाळण्यासाठी तसेच काला जठेडी पोलिसांच्या ताब्यातून पळून जाऊ नये या साठी दिल्ली पोलिसांनी खास व्युव्हरचना आखली आहे. "बँक्वेट हॉलच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत. लग्न समारंभात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना प्रवेश करण्यापूर्वी बार-कोड बँड दिले जातील आणि प्रवेश पासाशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही," असे दिल्ली पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, बँक्वेट हॉलजवळील पार्किंगमध्ये वाहन पार्क करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, अर्धा डझनहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लग्न मंडपात बसवण्यात आले आहेत. लग्नादरम्यानच्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात सहभागी होणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये स्पेशल सेल, क्राइम ब्रँच आणि हरियाणा पोलिस सीआयएच्या टीमचा समावेश असेल. याशिवाय राजस्थान पोलीस आणि एनआयएचे अधिकारीही लग्नावर लक्ष ठेवणार आहेत.
काही पोलीस अधिकारी साध्या वेशात शस्त्रास्त्रांसह सज्ज असतील आणि कार्यक्रमस्थळी कडक नजर ठेवतील. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, कला जठेडीच्या कुटुंबाने आधीच स्थानिक पोलिसांना १५० पाहुण्यांची यादी शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की, लग्नाच्या वेळी वेटर आणि इतर कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दिले जातील.
हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी असलेला संदीप हा एकेकाळी मोस्ट वॉन्टेड होता आणि त्याच्यावर ७ लाखांचे बक्षीस होते. सध्या तिहार तुरुंगात बंद असलेल्या काला जथेडीला दिल्ली न्यायालयाने लग्नासाठी सहा तासांचा पॅरोल दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कलाला लग्नासाठी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत पॅरोलची परवानगी देण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ मार्चला तिला हरियाणातील सोनीपत येथील जथेडी या गावी नेले जाईल, जिथे हे जोडपे लग्नानंतरचे विधी पूर्ण करतील.
संदीपला तिसऱ्या बटालियन युनिटच्या मोठ्या संख्येने पोलीस कर्मचाऱ्यांसह घेऊन जाणार आहे. कैद्याला कारागृहातून बाहेर काढून पुन्हा कारागृहात नेण्याचे काम या युनिटकडे सोपवले गेले आहे.
संबंधित बातम्या