मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दुसऱ्यासोबत लग्न केलेल्या प्रेयसीचा बदला, हात-पाय बांधून कॅमेऱ्यासमोर ८ मित्रांसह बलात्कार

दुसऱ्यासोबत लग्न केलेल्या प्रेयसीचा बदला, हात-पाय बांधून कॅमेऱ्यासमोर ८ मित्रांसह बलात्कार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 25, 2024 06:37 PM IST

Nationl Crime News : दुसऱ्यासोबत लग्न केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने आपल्या माजी प्रेयसीचे अपहरण करून आठ मित्रांच्या साथीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

इंदूर शहरातील द्वारकापुरी पोलीस ठाणे क्षेत्रात २३ वर्षीय महिलेवर ८ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दुसऱ्यासोबत लग्न केल्याने चिडलेल्या माजी प्रियकराने आपल्या मित्रांसोबत मिळून महिलेचे अपहरण केले व निर्जनस्थळी जाऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडिते चार वर्षापूर्वी लग्न झाले असून यामुळे आरोपी नाराज होता व याचा बदला घेण्याच्या विचारात होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पीडितेने तक्रार दाखल केली आहे की, परिसरात राहणाऱ्या अंकितने तिचे सहा महिन्यापूर्वी अपहरण केले होते व निर्जनस्थळी जाऊन सामूहिक बलात्कार केला. त्याने तिला धकमी दिली होती की, जर याची वाच्यता कुठे केल्यास तिच्या बहिणीसोबतचही असचे केले जाईल. सहा महिन्यानंतर पीडितेने आपली आपबीती सांगत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून तीन जण फरार आहेत.

पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी अंकित कदम आणि पीडिता दोघे एकमेकांवर प्रेम करत होते. मात्र दोघांचा विवाह होऊ शकला नाही. चार वर्षापूर्वी पीडितेने दुसऱ्या युवकासोबत लग्न केले. यामुळे अंकित कदम नाराज होते. त्याने पीडितेशी संपर्क साधून भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो तिच्यावर दबाव टाकत होता. 

पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिला एक मूलही आहे. काही दिवसापूर्वी कर्जाची रक्कम बँकेत जमा करण्यासाठी जात होती. ती एकटीच असल्याचे पाहून अंकितने तिचे अपहरण करून मित्रांसोबत मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. त्यांनी पीडितेचे हात-पाय बांधून बलात्कार करतानाचा व्हिडिओ बनवला होता. याप्रकरणी मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक केली आहे.

WhatsApp channel