मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक.. महिला व तिच्या ६ वर्षीय मुलीवर चालत्या कारमध्ये गँगरेप
सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र
27 June 2022, 22:20 ISTShrikant Ashok Londhe
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 22:20 IST
  • चालत्या कारमध्ये एक महिला आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलीवर कारचालक व त्याच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली – उत्तराखंड राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चालत्या कारमध्ये एक महिला आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलीवर कारचालक व त्याच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील रूडकी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महिलेने तिच्या मुलीला गंभीर अवस्थेत घेऊन पोलीस गाठले आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पीडितांना सरकारी रुग्णालयात दाखल केले. मुलीवर ३ तास डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. पोलिसांनी महिलेला सोबत घेऊन रात्रीच्या सुमारास कार चालकाचा शोध घेतला. जवळच बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले. दुसरीकडे, पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवर सामूहिक बलात्कारासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, ती महिला तिच्या सहा वर्षांच्या मुलीसह रात्रीच्या वेळी पिरान कालियार या मुस्लिम धार्मिक स्थळावरून तिच्या घरी जात होती, तेव्हा सोनू नावाच्या व्यक्तीने तिला लिफ्ट देऊ केली. पोलीस अधीक्षक (ग्रामीण) प्रमेंद्र डोवाल यांनी सांगितले की, त्या व्यक्तीचे काही मित्र आधीच कारमध्ये होते. फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, सोनू आणि त्याच्या मित्रांनी महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर लिफ्ट देण्याचे आमिष दाखवून चालत्या कारमध्ये बलात्कार केला आणि कालव्याजवळ फेकून दिले.

पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलेने गाडीत नेमके किती पुरुष होते हे सांगू शकले नसले तरी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला इतरांनी सोनू म्हणून हाक मारल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी पुढे सांगितले की, महिला आणि तिच्या मुलीला रुडकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्यांच्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. 

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग