पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना मिळत असलेल्या धमक्यांच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पूर्णियाचे एसपी कार्तिकेय के शर्मा यांनी प्रेस कॉन्फ्रन्स घेऊन सांगितले की, पप्पू यादव यांची सुरक्षा वाढवण्यासाठी धमकीचे नाटक रचले गेले. त्यामध्ये यादव यांच्या जवळच्या व्यक्तींचा हात आहे. आरोपी रामबाबू याला पैशांचे आमिष दाखवून हे काम केले गेले. हा गुन्हा आरोपीने कबूल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की,पप्पू यादव यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा काही संबंध नाही. किंवा दूरपर्यंत तशी काही शक्यताही दिसत नाही. हे संपूर्ण प्रकरण खासदाराची सुरक्षा वाढवण्याच्या कटाचा भाग आहे.ज्या तरुणाने व्हिडिओ पाठवून एक डिसेंबरच्या रात्री धमकी दिली होती. तो पप्पू यादव यांचा जुना पक्षाचा नेतहा राहिलेला आहे. ४-५ वर्षापूर्वी खासदार त्यांच्या गावालाही गेले होते. तेथे आरोपीने पप्पू यादव यांच्यासोबत फोटोही काढले होते. आरोपी त्यांचा समर्थक राहिला आहे.
आरोपीला भोजपूर येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने कबूल केलं आहे की, खासदाराच्या जवळच्या काही लोकांनी सुरक्षा पुरवण्यासाठी व्हिडीओ बनवण्यास आणि धमकी देण्यास सांगितलं होतं. पप्पू यादव यांच्या लोकांनी त्यासाठी पैसेही दिले. याशिवाय पक्षात पद देण्याचं आमिषही देण्यात आलं होतं.
राम बाबू असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी पोलिसांचा दावा फेटाळला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्टही केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी राम बाबू याने कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचं सांगून पप्पू यादवला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
पप्पू यादव धमकी प्रकरणात दोन व्हिडिओ बनवले गेले होते. पहिला व्हिडिओ एक डिसेंबर रोजी रात्री पाठवला होता तर दूसरा व्हिडिओ टाइमच्य़ा हिशोबाने पाठवायचा होता. दोन्ही व्हिडिओ आधीच शूट केले होते. १ डिसेंबरला आरोपींनी १३ सेकंदाचा एक व्हिडीओ पाठवला होता, ज्यामध्ये त्याने म्हटलं होतं की, आम्हाला पप्पू यादवला ५-६ दिवसांत मारण्याचे आदेश मिळाले आहेत, आम्ही त्याला लवकरच मारून टाकू, आम्ही पाटण्याला पोहोचलो आहोत. यानंतरपोलिसांनी आरोपी राम बाबू राय याला अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.
आरोपीने खासदाराच्या ज्या जवळच्या व्यक्तींची नावे सांगितले, त्यांचीही चौकशी केली जाईल. एसपी कार्तिकेय के शर्मा यांनी सांगितले की, रामबाबू यादव याने पैशाचे आमिष दाखवून धमकीचे व्हिडिओ बनवणे व पाठवण्यास सांगितल्याबाबत जे दावे केले आहेत, त्याची पोलीस चौकशी करत आहेत. रामबाबू याने चौकशीत पप्पू यादव यांच्या जवळच्या ज्या व्यक्तींनी नावे सांगितली आहेत, त्यांची चौकशी केली जात आहे. पोलीस रामबाबू यादव खरे बोलत हे की नाही, याचीही चौकशी करत आहे.
संबंधित बातम्या