Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेसाठी भारताने निवडले अंतराळवीर, 'हे' चौघे रचणार इतिहास
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेसाठी भारताने निवडले अंतराळवीर, 'हे' चौघे रचणार इतिहास

Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेसाठी भारताने निवडले अंतराळवीर, 'हे' चौघे रचणार इतिहास

Published Feb 27, 2024 07:30 AM IST

Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेबाबत मोठी अपडेट आली आहे. या मोहिमेसाठी पाठवण्यात येणाऱ्या पहिल्या चार अंतराळवीर निवडण्यात आले आहेत. त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.

Gaganyaan Mission astronauts
Gaganyaan Mission astronauts

Gaganyaan Mission astronauts : गगन यान मोहिमेबाबत मोठी अपडेट आली आहे. गेल्या आठवड्यात या मोहिमेसाठी लागणाऱ्या इंजिनाची यशस्वी चाचणी इस्रोने घेतली होती.. त्यानंतर या मोहिमेचा महत्वाचा भाग असलेल्या चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. हे चौघे अंतराळात जाऊन इतिहास रचणार आहेत.

इस्रोने गगनयान मोहिमेबाबत मोठी अपडेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळात पाठवण्याच्या तयारीत असलेल्या देशातील संभाव्य अंतराळवीरांची भेट घेणार आहेत. आतापर्यंत या मोहिमेसाठी निवडण्यात आलेली अंतराळवीरांची नावे सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेली नाहीत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या मोहिमेसाठी चार जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि चौहान यांचा समावेश आहे. चव्हाण यांच्या पूर्ण नावाची माहिती मिळालेली नाही.

हे चौघे एकतर विंग कमांडर किंवा ग्रुप कॅप्टन असल्याची माहिती आहे. हे चारही अंतराळवीर अंतराळात जाण्यासाठी बेंगळुरूमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. आज मंगळवारी, पंतप्रधान मोदी त्यांना इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये भेटू शकतात. विशेष म्हणजे गगनयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारत अंतराळात मानव पाठवणारा चौथा देश बनेल.

गगनयान मोहिमेत अंतराळवीर म्हणून जाण्यास मोजक्या वैमानिकांनी स्वारस्य दाखवले. यातील १२ जण निवडीचा पहिला टप्पा पार करू शकले. या मोहिमेची तयारी २०१९ मध्ये भारतीय वायुसेनेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या एअरोस्पेस मेडिसिन संस्थेत म्हणजेच IAF बेंगळुरू येथे सुरू आहे. निवड प्रक्रियेच्या अनेक फेऱ्यांनंतर आयएएमने चौघांच्या नावांना मंजुरी दिली होती.

२०२० मध्ये चार जणांना इस्रोने सुरुवातीच्या प्रशिक्षणासाठी रशियाला पाठवले होते. हे प्रशिक्षण २०२१ मध्ये संपले. कोविड मुळे प्रशिक्षण पूर्ण होण्यास वेळ लागल्याचे बोलले जात आहे.

आणखी एक यश

बुधवारीच इस्रोने क्रायोजेनिक इंजिनची चाचणी पूर्ण झाल्याची माहिती दिली होती. गगनयान मोहिमेसाठी CE20 क्रायोजेनिक इंजिन आता 'मानवी रेटिंग' असल्याचे भारतीय अंतराळ संस्थेने म्हटले होते. अधिक माहिती देण्यात आली, 'कठोर चाचणीनंतर इंजिनची कार्यक्षमता समोर आली आहे...' विशेष बाब म्हणजे आता हे इंजिन LVM3 वाहनाच्या वरच्या टप्प्याला उर्जा देईल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर