WhatsApp new feature : व्हॉट्सॲपमध्ये एक नवीन फीचर येणार आहे. हे फीचर व्हॉट्सॲप यूझर्सना टेलिग्राम, सिग्नल, आयमेसेज आणि गुगल मेसेजेस सारख्या थर्ड पार्टी ॲप्सवर मेसेजिंग आणि कॉल करण्याची सुविधा देणार आहे. मेटाने ही सेवा व्हॉट्सॲपमध्ये एकत्रित करण्यासाठी नवे फीचर आणणार आहे. या बाबत कंपनीने ब्लॉग पोस्टमध्ये माहिती देतांना म्हटलं आहे की, यूझर्सची गोपनीयता व सुरक्षा राखण्यासाठी कंपनी या प्रकारच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. यासोबतच मेटाने एक फोटोही शेअर केला आणि व्हॉट्सॲप आणि मेसेंजरवर थर्ड पार्टी चॅट्स कसे दिसतील हे देखील दाखवल आहे.
थर्ड पार्टी ॲप्ससाठी कॉलिंग फीचर २०२७ मध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. या बाबत मेटा ने सांगितले की, थर्ड पार्टी चॅट्सबद्दल वापरकर्त्यांना सूचित करण्यासाठी WhatsApp आणि मेसेंजरमध्ये नवीन नोटिफिकेशन्स तयार करण्यात आले आहेत. हे वापरकर्त्याला नवीन मेसेजिंग ॲपवरून येणाऱ्या संदेशांबद्दल माहिती किंवा नॉटिफिकेशन देईल. विशेष बाब म्हणजे यामध्ये यूजर्स हे ठरवू शकतील की त्यांना कोणत्या थर्ड पार्टी ॲपवरून मेसेज येऊ द्यायचे आहेत. मेटा ने दिलेल्या माहितीनुसार युजर्स सर्व मेसेज एकाच इनबॉक्समध्ये पाहू शकतील.
यूझर्स इच्छित असल्यास, ते थर्ड पार्टी चॅटसाठी स्वतंत्र फोल्डर देखील तयार करू शकणार आहेत. वापरकर्त्यांना 'रिच मेसेजिंग फीचर्स' जसे की टाइपिंग इंडिकेटर, रीड रिसीप्ट, डायरेक्ट रिप्लाय आणि थर्ड पार्टी ॲप्ससह चॅटिंगसाठी प्रतिक्रिया मिळतील. कंपनीने सांगितले की ते २०२७ मध्ये कॉलिंगचे फीचरचे अपडेट यूझरसाठी उपलब्ध करून देतील. मेटा ने युरोपियन युनियनच्या डिजिटल मार्केट ॲक्ट अंतर्गत व्हॉट्सॲप आणि मेसेंजरमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
व्हॉट्सॲप लवकरच ग्रुप चॅटमध्ये कॉल लिंकची सुविधा देणार आहे. WABetaInfo ने WhatsApp च्या या आगामी फीचरबद्दल माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, या फीचरच्या मदतीने यूजर्स ग्रुप चॅटमध्येच कॉल लिंक तयार करू शकतील. या फीचरची खास गोष्ट म्हणजे याद्वारे केलेले कॉल युजर्सना रिंग न वाजता सुरू राहतील.
हे फीचर गुगल मिट सारखेच आहे, ज्यामध्ये वापरकर्ते लिंकद्वारे इतर सदस्यांशी कनेक्ट होतात. WABetaInfo ने Android 2.24.19.14 साठी WhatsApp Beta मध्ये हे वैशिष्ट्य आणणार आहे. बीटा चाचणी पूर्ण झाल्यानंतर, हे वैशिष्ट्य जागतिक वापरकर्त्यांसाठी बाजारात आणले जाणार आहे.