मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Google : जीमेलचा वापर होणार आता आणखी सोपा! गुगलनं आणलेलं AI चं फीचर आहे खूपच खास

Google : जीमेलचा वापर होणार आता आणखी सोपा! गुगलनं आणलेलं AI चं फीचर आहे खूपच खास

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 15, 2024 02:37 PM IST

Google लवकरच Gemini १.५ प्रो वर्कस्पेसच्या साइड पॅनलमध्ये उपलब्ध होणार आहे. या वर्कस्पेसमध्ये जेमिनीद्वारे फाइल्स किंवा ईमेल डेटा शोधण्यात लागणारा वेळ आता वाचणार आहे. हे नवीन साइड पॅनल प्रथम जीमेल, डॉक्स, शीट, स्लाइड आणि ड्राइव्ह वर रोल आउट करण्यात येणार आहे.

जीमेल वापरण्याची अनुभव होणार खास! गुगलने आणलेले AI चे फीचर आहे भन्नाट
जीमेल वापरण्याची अनुभव होणार खास! गुगलने आणलेले AI चे फीचर आहे भन्नाट

Google News : गूगलचे मेलिंग साईट जीमेल वापरण्याचा अनुभव आता आणखी भन्नाट होणार आहे. गूगलने१४ मे रोजी झालेल्या इंटरनॅशनल आयओ इव्हेंटमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या. यात AI वर जास्त भर देण्यात आला. कंपनीने या इव्हेंटमध्ये जेमिनी एआयच्या नव्या अपग्रेडची माहिती दिली. Google ने म्हटले आहे की वापरकर्त्यांना वर्कस्पेस टास्कमध्ये जेमिनी पॉवर एआय ऑटोमेशन पाहायला आणि वापरता येणार आहे. यासाठी, गूगल लवकरच जेमीनी १.५ प्रो वर्कस्पेसच्या साइड पॅनलमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या वर्कस्पेसमध्ये जेमिनीद्वारे फाइल्स किंवा ईमेल डेटा शोधण्यात लागणारा वेळ आता वाचणार आहे. हे नवीन साइड पॅनल प्रथम जीमेल, डॉक्स, शीट, स्लाइड आणि ड्राइव्ह वर रोल आउट करण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ही आयपीएल आहे, परफॉर्म करा नाहीतर… पृथ्वी शॉला बाहेर बसवल्याच्या चर्चेवर प्रवीण आमरे परखड बोलले!

असे असेल ईमेलचे वैशिष्ट्य

जीमेलच्या मोबाईल ॲपमध्ये कंपनी सारांशित ईमेलचा पर्याय देणार आहे. हे वापरकर्त्यांना ईमेल थ्रेड वाचून जीमेल ॲपमधील लांब थ्रेड्सचे छोटे दृश्य दिसेल. सारांशित हायलाइटसाठी, जीमेल ॲपच्या वरच्या बाजूला असलेल्या 'सारांश' बटणावर टॅप करावे लागेल. गुगलने सांगितले की हे फीचर या आठवड्यात वर्कस्पेस लॅब वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. या सोबतच वर्कस्पेस ग्राहकांसाठी जेमिनी आणि गूगल वन एआय प्रीमियम सदस्यांना यासाठी पुढील महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Google
Google

जीमेल मध्ये मिळणार प्रश्न-उत्तरांचा पर्याय

गूगलजीमेलमध्ये 'Gmail प्रश्नोत्तरे' हे नवे फीचर देखील आणणार देखील आणणार आहे. यामध्ये यूजर्स जीमेलशी त्यांच्याच भाषेत बोलू शकतील आणि त्यांना प्रश्न विचारू शकतील. हा पर्याय डेस्कटॉपच्या साइड पॅनेलसारखा राहणार आहे. वापरकर्त्यांना एक प्रॉम्प्ट बॉक्स सुद्धा दिला जाणार आहे. या नव्या फीचरद्वारे जीमेल ईमेलमध्ये मेलद्वारे आलेल्या अनेक जुन्या पिडीएफ फाईल्स सहजपणे शोधण्यात मदत होणार आहे. कंपनी जुलैमध्ये मोबाइल आणि वेबवर वर्कस्पेस लॅब वापरकर्त्यांसाठी जीमेल प्रश्नोत्तरे फीचर अपडेट करणार आहे.

जीमेलसाठी वापरकर्त्यांना 'कॉन्टेक्चुअल स्मार्ट रिप्लाय' हे फीचरही दिले जाणार आहे. हे वैशिष्ट्य सध्याच्या एआय शक्तीच्या स्मार्ट रिप्लाय आणि स्मार्ट कंपोज टूल्ससारखे आहे. वास्तविक, नवीन एआय चलित फीचर ईमेलचा संदर्भ समजून घेऊन वापरकर्त्याला कस्टमाइझ उत्तर देणार आहे. हे फीचर जुलैच्या सुरुवातीस वर्कस्पेस लॅब्स मोबाइल आणि वेब वापरकर्त्यांसाठी कंपनीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

गूगलने आयओ इव्हेंटमध्ये सांगितले की वापरकर्ते लवकरच त्यांच्या जीमेल गूगल मेसेज आणि इतर ॲप्समध्ये AI जनरेट केलेले फोटो ड्रॅग आणि ड्रॉप करण्यास देखील सक्षम राहणार आहेत. याशिवाय, कंपनी यूट्यूब वापरकर्त्यांना यूट्यूब व्हिडिओंमध्ये कोणतीही विशिष्ट माहिती शोधण्यासाठी 'आस्क हा व्हिडिओ' पर्याय देखील प्रदान करणार आहे. जेमिनी १.५ प्रो आता जागतिक स्तरावर विकसकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

IPL_Entry_Point

विभाग