Google News : बहुराष्ट्रीय कंपन्या व संस्था या त्यांच्या कंपनीशी संबंधित महत्वाची माहिती व डेटा हा गूगल क्लाउड स्टोरेजच्या मदतीने सेव्ह करत असतात. या माहितीच्या सुरक्षेसाठी गूगल जबाबदार असते. या साठी संबंधित कंपन्या गूगलला पैसे देखील मोजत असतात. मात्र, गूगलच्या एका छोट्या चुकीमुळे एका छोट्याशा चुकीमुळे अत्यंत महत्त्वाचा डेटा डिलीट झाला आहे. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? या समबंधीची एक घटना ही नुकतीच उघडकीस आली आहे. ज्यात गुगल क्लाउडने मोठी चूक केली आणि चुकून ऑस्ट्रेलियाचा मोठा पेन्शन फंड असलेल्या UniSuper चे खाते डिलीट करण्यात आले. यामुळे हजारो नागरिकांची माहिती आणि त्यांच्या पैशासंबंधीचे सर्व व्यवहार हे उडाले आहेत. तब्बल १२५ अब्ज डॉलर्स (सुमारे १०४ ट्रिलियन रुपये) गूगलच्या चुकीमुळे उडाले आहेत.
गुगल क्लाउडच्या चुकीमुळे डिलीट करण्यात आलेल्या खात्यात १२५ अब्ज डॉलर्स (सुमारे १०४ ट्रिलियन रुपये) पेन्शन रकमेशी संबंधित डेटा हा डिलीत झाला असल्याचे उघड झाले आहे. या चुकीमुळे, UniSuper चे ६२०००० पेक्षा जास्त सदस्य जवळपास आठवडाभर त्यांच्या सेवानिवृत्ती खात्यात कोणतीच रक्कम जमा करू शकले नाही किंवा त्यांचा खात्याचा तपशील देखील ते जाणू शकले नाही. यमुळे ही कंपनी अडचणीत सापडली आहे. सुदैवाने कंपनीकडे या डेटाचा बॅकअप असल्याने डिलीत झालेला हा डेटा पुन्हा स्थापन करण्यात आला.
१ मे २०२४ रोजी पेन्शन फंड खाते डिलीट झाल्याची नोंद आहे. UniSuper ने सांगितले की Google Cloud मध्ये चुकीच्या कॉन्फिगरेशनमुळे कंपनीचा मोठा डेटा हा डिलीट झाला. गुगल आणि युनिसुपर या दोन्ही कंपन्यांनी या घटनेबद्दल माफी मागितली आहे. तसेच खाते डिलीट झाल्यामुळे कोणत्याही सदस्याच्या डेटा किंवा पैशावर परिणाम झाला नसल्याची ग्वाही दिली आहे.
वास्तविक, युनिसुपरने आउटेज किंवा नुकसान टाळण्यासाठी दोन भौगोलिक प्रदेशांमध्ये डुप्लिकेशन केले होते. जर एका ठिकाणी समस्या असल्यास, वापरकर्त्यांना त्यांचे खाते आणि दुसऱ्या ठिकाणाहून डेटाचा प्रवेश देण्यात आला. मात्र, युनिसुपरचे खाजगी क्लाउड सबस्क्रिप्शन हटवल्यामुळे दोन्ही ठिकाणचा सर्व डेटा डिलीट झाल्याने खातेधारकांना बराच त्रास सहन करावा लागला.
युनिसुपरने सांगितले की त्यांच्याकडे एक बॅकअप खाते देखील आहे, ज्याच्या मदतीने डिलीट झालेला डेटा हा पुन्हा मिळवण्यात आला. हा डेटा डिलीत झाल्यामुळे क्लाउड कॉम्प्युटिंगच्या सुरक्षिततेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी क्लाउड सेवा देणाऱ्या कंपन्यांना आवश्यक सुधारणा कराव्या लागतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.