छत्तीसगड राज्यातील बलौदाबाजार जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील लच्छनपूर गावात दोन मित्रांत झालेल्या वादातून एकाने फाशी घेऊन आत्महत्या केली. दोन मित्र सोबत बसून दारू पीत होते. यावेळी दोघांमध्ये काही कारणावरून वाद सुरू झाला. वाद इतका विकोपाला गेला की, दोघे मारहाण करू लागले. त्यानंतर त्यातील एकाने घरी येऊन गळफास घेतला व आपले जीवन संपवले. पोलिसांनी दुसऱ्या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा हा तरुण घरी आला तेव्हा तो प्रचंड रागात होता. रागाच्या भरात त्याने चाकूने आपले गळा चिरण्याचा प्रयत्न केला. मात्र घरच्या लोकांनी त्याला रोखले. त्यानंतर त्याने खोलीत स्वत:ला बंद करून घेत गळफास घेतला. नातेवाईकांनी त्याला खाली उतरवून तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी करही बाजार, सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
पोलिसांनी सांगितले की, नातेवाईकांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मृतदेहाचे पोस्टमार्टम केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. चौकशीत समोर आले की, २ मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मृत राकेश पाटले आपल्या गल्लीतील मित्र धनलाल जांगडे उर्फ धन्ना जांगडे याच्यासोबत गावातील एका पुलाखाली दारू पीत होता. दारूच्या नशेत राकेश धनलाल यांच्या पत्नीच्या चारित्र्यावर बोलू लागला. पत्नीविषयी अश्लील बोलताना धनलालला राग आला व त्याने रागाच्या भरात राकेशला २-३ थप्पड मारल्या तसेच त्याचा नवीन मोबाइल जमिनीवर आपटून फोडला.
यामुळे नाराज झालेला राकेश घरी आला व त्याने ही घटना नातेवाईकांना सांगितली व आपला गळा कापण्याचा प्रयत्न केला. घरच्या लोकांनी त्याची समजूत काढल्यानंतर तो घरात गेला व दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी धनलाल ऊर्फ धन्ना जांगडे या अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
संबंधित बातम्या