इन्स्टाग्रामवरील मित्रानं केला विश्वासघात! तरुणीवर ६० जणांनी केला बलात्कार, ५७ जणांना अटक
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  इन्स्टाग्रामवरील मित्रानं केला विश्वासघात! तरुणीवर ६० जणांनी केला बलात्कार, ५७ जणांना अटक

इन्स्टाग्रामवरील मित्रानं केला विश्वासघात! तरुणीवर ६० जणांनी केला बलात्कार, ५७ जणांना अटक

Jan 20, 2025 11:11 AM IST

kerala rape case : केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणीवर तब्बल ६० जणांनी बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. पीडितेच्या जबाबावरून जिल्ह्यातील चार पोलिस ठाण्यात एकूण ३० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इन्स्टाग्रामवरील मित्रानं केला विश्वासघात! सुरू केली बलात्काराची मालिका, तरुणीवर ६० जणांनी केले अत्याचार, ५७ जणांना अटक
इन्स्टाग्रामवरील मित्रानं केला विश्वासघात! सुरू केली बलात्काराची मालिका, तरुणीवर ६० जणांनी केले अत्याचार, ५७ जणांना अटक (HT_PRINT)

kerala rape case :  केरळमध्ये गेल्या पाच वर्षांत एका दलित मुलीवर तब्बल ६० जणांनी बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. ही तरुणी १३ वर्षांची असतांना तिच्यावर बलात्कार करण्यात आला असून गेल्या पाच वर्षात तिच्यावरील अत्याचारांची मालिका ही सुरूच आहे. या प्रकरणी ४ पोलिस ठाण्यात ३० विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या केरळ पोलिसांच्या विशेष तपास पथकाने या प्रकरणाशी संबंधित ५७  आरोपींना अटक केली आहे, असे पठाणमथिट्टा जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. 

जिल्हा पोलिस प्रमुख व्ही. जी. विनोद कुमार यांनी सांगितले की, एलवुमथिट्टा पोलिस ठाण्यात १० जानेवारी रोजी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची  सखोल चौकशीनंतर दोन वगळता सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक न झालेले दोन आरोपी परदेशात फरार झाले आहेत.   अटक करण्यात आलेला शेवटचा आरोपी २५ वर्षीय तरुण असून त्याला रविवारी सकाळी त्याच्या घराजवळून अटक करण्यात आली. आयपीएस अधिकारी एस. अजिता बेगम यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) जिल्हा पोलिस प्रमुखांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास करत आहे.

पीडितेच्या जबाबावरून जिल्ह्यातील चार पोलिस ठाण्यात एकूण ३० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तपास पूर्ण करून लवकरात लवकर दोषारोपपत्र सादर करणे हे पोलिस पथकाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की अनेक आरोपी पथानामथिट्टा येथील एका खाजगी बस स्टॉपवर मुलीला भेटले होते. त्यानंतर तिला कारमधून  वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.   पीडित तरुणी गेल्या वर्षी बारावीच्या वर्गात शिकत असताना तिच्याशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका तरुणाने तिला रन्नी येथील रबर मळ्यात घेऊन गेला आणि त्याने इतर तिघांसह तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, या तरुणीवर किमान पाच वेळा सामूहिक बलात्कार करण्यात आला. ज्यामध्ये कारमध्ये आणि २०२४ मध्ये पाथानामथिट्टा येथील जनरल हॉस्पिटलमध्ये झालेल्या प्रकाराचाही समावेश आहे.  पीडितेने तक्रार केली आहे की, ती १३  वर्षांची असल्यापासून ६२ जणांनी तिचे लैंगिक शोषण केले.

अशी फुटली अत्याचाराला वाचा

 महिला समक्य नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी त्यांच्या नियमित क्षेत्र भेटीचा भाग म्हणून मुलीच्या घरी पोहोचल्यावर ही बाब उघडकीस आली. मुलीने पाच वर्षांमध्ये अनुभवलेल्या भयावहतेचे कथन केले. त्यानंतर एनजीओने पथनामथिट्टा जिल्ह्यातील बालकल्याण समितीकडे याची तक्रार केली. CWC ने मुलीला समुपदेशन दिले आणि तिने मानसशास्त्रज्ञांसमोर खुलासा केला. तिच्या समुपदेशन सत्रादरम्यान, मुलीने दावा केला की ती केवळ १३ वर्षांची असताना तिच्या शेजाऱ्याने तिच्यासोबत पॉर्न व्हिडिओ दाखवून अत्याचार सुरू केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर