मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; मंत्र्याचं घर जाळलं, काही ठिकाणी ग्रेनेड हल्ले
Manipur Violence
Manipur Violence

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; मंत्र्याचं घर जाळलं, काही ठिकाणी ग्रेनेड हल्ले

25 May 2023, 11:24 ISTGanesh Pandurang Kadam

Manipur Violence : आरक्षणाच्या मुद्द्यावरून धुमसणाऱ्या मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला असून एका मंत्र्याचं घर पेटवून देण्यात आलंय.

Manipur Violence : मैतेयी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचार थांबण्याचं नावच घेत नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पूर्वनियोजित भेटीच्या एक दिवस आधी, बुधवारी पुन्हा हिंसाचार उफाळला. जमावानं मंत्र्याच्या घराला लक्ष्य करत ते पेटवून दिलं. काही ठिकाणी ग्रेनेड हल्लेही करण्यात आले. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मैतेयी समाजाला एसटीचा दर्जा देण्याच्या विरोधात ३ मेपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. तब्बल २१ दिवसांनंतरही हा हिंसाचार सुरूच आहे. त्यामुळं अनेक जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असं असतानाही काल सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद कोंथोइजाम यांच्या घरावर हल्ला झाला. बिष्णुपूर जिल्ह्यातील ट्रोंगलाओबी गावातही हिंसाचार झाला. यावेळी तोयजाम चंद्रीमनी नावाच्या तरुणाला गोळी लागून त्यात त्याचा मृत्यू झाला.

इस्रोचे प्रमुख म्हणतात, विज्ञानाचा जन्म वेदांमधून झाला, पण पाश्चात्यांनी स्वत:च्या नावावर खपवला

बिशनपूर, इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील संचारबंदी पुन्हा कडक करण्यात आली आहे. विष्णुपूरमधील हिंसाचारानंतर लोकही रस्त्यावर उतरले. लोक मदत छावणीतून बाहेर आले. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. मंगळवारी चुराचंदपूर परिसरात मेईतेई आणि कुकी समाजाची घरं जाळण्यात आली.

लष्करानं दिलेल्या माहितीनुसार, कांगचुक चिंगखाँग जंक्शन इथं पाच राऊंड गोळीबार करण्यात आला. याशिवाय मारुती अल्टो कार पेटवून देण्यात आली. अनेक ठिकाणी ग्रेनेडही फेकण्यात आले. तीन जणांना अटक करण्यात आली.

Monsoon Update : मॉन्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण; भारतीय हवामान विभागानं दिली महत्वाची अपडेट

मणिपूरमधील हिंसाचारानंतर ईशान्येतील इतर राज्येही चिंतेत आहेत. मणिपूरची परिस्थिती गंभीर असून सरकारनं दंगलखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी केली आहे. नागालँडनंही आपल्या सीमेवर बंदोबस्त वाढवला आहे. मणिपूरमधील निम्मी लोकसंख्या मैतेयी समुदायाची आहे. उच्च न्यायालयानं राज्य सरकारला मैतेयी समुदायाच्या मागणीचा विचार करून चार महिन्यांत केंद्र सरकारला शिफारस पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. तेव्हापासून हा आगडोंब उसळला आहे.

मैतेयी समाजाचं म्हणणं काय?

स्वातंत्र्यापूर्वी आम्हाला अनुसूचित जमातीचा दर्जा होता, असं मैतेयी समुदायाचं म्हणणं आहे. गेल्या काही वर्षांत या समुदायाची लोकसंख्या घटली आहे. आपल्या सांस्कृतिक अस्मितेचं रक्षण करण्यासाठी आरक्षण द्यावं, अशी या समाजाची मागणी आहे. तर नागा आणि कुकी जमाती या आरक्षणाच्या विरोधात आहेत. राज्यात एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३४ टक्के नाग आणि कुकी आहेत.

विभाग