Aadhaar update deadline extended: आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी विनामूल्य कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने १४ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवली आहे. यामुळे ज्या लोकांना आपल्या आधारकार्डमध्ये बदल करायचे आहेत, त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. १४ डिसेंबरनंतरही आधारकार्डमध्ये बदल करणे शक्य असेल. परंतु, त्यासाठी पैसे द्यावे लागतील. सध्या मोफत उपलब्ध असलेली ही सेवा मायआधार पोर्टलद्वारे वापरता येणार आहे.
आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्रे म्हणून ग्राह्य धरले जाते, जे आजकाल प्रत्येक कामासाठी आवश्यक आहे. तुम्हाला रेल्वेचे किंवा विमानाचे तिकीट बुक करायचे असेल किंवा तुमची ओळख सिद्ध करायची असेल, प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड विचारले जाते. आधार कार्डमध्ये केवळ आपल्या ओळखीशी संबंधित वैयक्तिक माहिती नसते, तर अनेक सरकारी योजनांचा लाभ घेणे देखील आधारशिवाय शक्य नाही.
रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र, पासपोर्ट, पासबुक अशी काही कागदपत्रे अपलोड करून आधारच्या तपशीलात बदल करता येतात. १० वर्षातून एकदा तरी आधार अपडेट करणे आवश्यक आहे. विशेषत: जर आपल्याला त्यासंबंधीत मॅसेज आला असेल तर लगेच करून घ्यावे. मायआधार पोर्टलद्वारे किंवा कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावर वैध पुराव्याचे कागदपत्रे वापरून आधार कार्डमधील पत्ता बदलता येऊ शकतो.