Viral news : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी घेतले क्रीडामंत्र्यांचे चुंबन; इंटिमेट फोटो झाले व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी घेतले क्रीडामंत्र्यांचे चुंबन; इंटिमेट फोटो झाले व्हायरल

Viral news : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी घेतले क्रीडामंत्र्यांचे चुंबन; इंटिमेट फोटो झाले व्हायरल

Published Jul 31, 2024 05:56 PM IST

France president Emmanuel macron viral photo: ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा क्रीडामंत्र्यांचे चुंबन घेत असल्याच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचे हे इंटिमेट फोटो व्हायरल होत आहेत.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी घेतले क्रीडामंत्र्यांचे चुंबन; इंटिमेट फोटो झाले व्हायरल
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी घेतले क्रीडामंत्र्यांचे चुंबन; इंटिमेट फोटो झाले व्हायरल

France president Emmanuel macron viral photo: फ्रान्समध्ये सध्या ऑलिम्पिक सुरू आहेत. ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी क्रीडामंत्र्यांचे जाहीरपणे घेतलेले चुंबन सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. दोघांच्या या इंटिमेट फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. मॅक्रॉन ज्या महिलेचे चुंबन घेत आहेत ती त्यांच्या सरकारमधील क्रीडा मंत्री आहे. तसेच त्या माजी टेनिसपटू देखील आहे. फोटोमध्ये पाहिले जाऊ शकते की क्रीडामंत्री आणि मॅक्रॉन एकमेकांना मिठी मारतात. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना बाहुपाशात घेत इंटीमेट होत कीस केले आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे क्रीडा मंत्री अमेली ओडेया-कॅस्टेरा यांचे चुंबन घेत असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे फोटो पाहून नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. मॅक्रॉनच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. बहुतेक लोकांनी दोघांच्या या कृतीला विचित्र म्हटले आहे. तर अनेकांचा या फोटोवर विश्वास बसलेला नाही, लोक व्हायरल झालेल्या या फोटोंना फेक फोटो देखील म्हणत आहेत. या फोटोवर एका सोशल मीडिया यूजरने म्हटले आहे की, मला हा फोटो अश्लील वाटत आहे, राष्ट्रपती आणि मंत्रीहे त्यांच्या पदासाठी लायकीचे नाहीत अशी झारी टीका त्यांनी केली आहे.

तर दुसऱ्या एका यूझरने कमेंट केली की, "मॅक्रोच्या पत्नीला हे आवडणार नाही. त्यांच्या शेजारी उभे असलेले मंत्री इतरत्र पाहण्याचे नाटक करत आहेत! तथापि, इतरांनी ओडिया यांचा इतर फोटोंचा हवाला देत दोघांचा हा फोटो पाहून राईचा डोंगर केला जात असल्याचं एकानं म्हटलं आहे. तर खेळाडूंचे चुंबन घेणे किंवा या प्रकारच्या घटना या फ्रान्समध्ये सामान्य आहेत, असे एका यूझरनं म्हटलं आहे. एका यूजरने लिहिले की, "फ्रेंच लोक एकमेकांना अभिवादन करण्यासाठी अनेकदा गालावर आणि मानेवर कीस करतात.

फोटो कसा व्हायरल झाला

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, या फोटोने लोकांचं लक्ष वेधून घेतलं, जेव्हा हा फोटो पहिल्यांदा 'मॅडम फिगारो' या फ्रेंच मॅगझिनने पोस्ट केला होता. मासिकाने दोघांमधील या प्रकारचे वर्तन हे विचित्र असल्याचं म्हटलं आहे. क्रीडा मंत्री ओडेया कास्टेरा हे माजी टेनिसपटू असल्याचा दावाही करण्यात आला. त्यांना स्वतःकडे लक्ष वेधून घेणे आवडत असल्याची टीका देखील करण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर