फ्रान्समध्ये पती-पत्नीमधील प्रेम आणि विश्वासाला तडा देणारी घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर पती-पत्नीच्या नात्यालाच काळिमा फासला गेला आहे. फ्रान्समध्ये एका निवृत्त वेतन घेऊन उदरनिर्वाह करणाऱ्या वृद्धावर पत्नीला नशेचा पदार्थ देऊन अनेक अनोळखी व्यक्तींना बलात्कार करायला लावल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे फ्रान्समध्ये खळबळ माजली आहे. या घटनेच्या विरोधात महिला निर्देशने करत आहेत. यासाठी आरोपी ऑनलाइन कस्टमर शोधात होता. या ७२ लोकांविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुख्य आरोपी ७१ वर्षीय वृद्ध असून तो फ्रान्सच्या वीज कंपनीत नोकरीला होता.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात ७२ पुरुषांनी ९२ वेळा बलात्कार केला आहे. त्यातील ५१ जणांची ओळख पटवण्यात आली आहे. २६ ते ७४ वर्षाच्या पुरुषांवर ७२ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. महिलेच्या वकीलांनी सांगितले की, पीडितेला अशा प्रकारे नशेचा पदार्थ दिला जात होता की, १० वर्षापर्यंत तिला समजलेच नाही की, तिच्यासोबत काय होत आहे. न्यायाधीशांनी सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी सार्वजनिक असेल कारण महिलेने म्हटले आहे की, सर्वांना या प्रकरणाची माहिती व्हावी.
महिलेचे वकील अँटोनी कामू म्हणाले की, तिच्यासाटी हा खटला म्हणजे एक भयंकर परीक्षा असेल. पहिल्यांदा तिला मागील १० वर्षात झालेल्या प्रत्येक बलात्काराबद्दल पुन्हा बोलावं लागणार आहे. २०२० मध्ये महिलेला सर्वात आधी लैंगिक अत्याचाराबद्दल समजलं. त्याआधीच्या काही आठवणी तिच्याकडे नाहीत, असं त्यांनी सांगितलं. १० वर्षातील अनेक बलात्कारांबद्दल तिला माहितीही नाही. याबाबत तिला पहिल्यांदा २०२० मध्ये समजले. महिला आपल्या तीन मुलांसह कोर्टात पोहोचली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात सप्टेंबर २०२० मध्ये मुख्य आरोपी डोमिनिक पी यांची चौकशी सुरू केली होती. त्याला एका सिक्युरिटी गार्डने एका शॉपिंग सेंटरमध्ये तीन महिलांसोबत अश्लील कृत्य करताना पकडले होते. पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीच्या कम्प्युटरमध्ये त्याच्या पत्नीचे शेकडो फोटो आणि व्हिडिओ मिळाले. ते बेशुद्धीच्या अवस्थेत काढले होते. यामध्ये बलात्काराचे फोटो व व्हिडिओही होते.
आरोपीने घरी येऊन आपल्या पत्नीवर बलात्कार करण्यासाठी लोकांना ऑनलाईन निमंत्रण दिलं होते. आरोपी डोमिनिक पी. याने पोलिसांना सांगितले की, त्याने आपल्या पत्नीला नशेचे पदार्थ दिले. पती बलात्काराच्या कृत्यात सहभागी होत होता. यावेळी तो त्यांचा व्हिडिओ बनवत होता. तेसच अश्लील कमेंट करत अनोळखी पुरुषांना उकसावत होता. बलात्कार करणाऱ्यांमध्ये एक फोर्कलिफ्ट ड्राइवर, एक फायर ब्रिगेड अधिकारी, एक कंपनी बॉस आणि एक पत्रकाराचा समावेश आहे. आरोपींमध्ये काही अविवाहित आणि घटस्फोटितही आहेत. तसेच काही विवाहित लोकही आहेत.
काही आरोपींनी सांगितले की, त्यांना वाटले की, ते या दाम्पत्याला त्यांच्या इच्छेने जगण्यासाठी मदत करत आहेत. घटनेच्या वेळी महिला झोपेत नव्हे तर कोम्यात गेल्यासारखी असायची. पतीने सांगितले की, केवळ तीन लोक न काही करत परत केले तर अन्य लोकांनी पत्नीशी संभोग केला.
आरोपीने सांगितले की, त्याने जे केले त्याचा त्याला पश्चाताप आहे. त्याचा गुन्हा अक्षम्य आहे. याचे त्याला व्यसन लागले होते. आरोपीवर १९९१ मध्ये एक हत्या आणि बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. त्याचबरोबर १९९९ मध्ये बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. या प्रकरणी शेकडो महिलांनी न्यायालयाच्या बाहेर काळे कपडे परिधान करत निर्देशने केली.