Chennai Air Force Show : चेन्नईमध्ये एअर शो पाहण्यासाठी लाखोंची गर्दी; उन्हामुळे चौघांचा मृत्यू, २३० जण पडले बेशुद्ध
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Chennai Air Force Show : चेन्नईमध्ये एअर शो पाहण्यासाठी लाखोंची गर्दी; उन्हामुळे चौघांचा मृत्यू, २३० जण पडले बेशुद्ध

Chennai Air Force Show : चेन्नईमध्ये एअर शो पाहण्यासाठी लाखोंची गर्दी; उन्हामुळे चौघांचा मृत्यू, २३० जण पडले बेशुद्ध

Updated Oct 07, 2024 07:21 AM IST

Chennai Air Force Show : चेन्नईमध्ये आयोजित भारतीय वायुसेनेचा एअर शो पाहण्यासाठी चेन्नईतील मरीना बीचवर लाखो नागरिक जमले होते. यावेळी झालेल्या गर्दीत चौघांचा मृत्यू झाला.

चेन्नईमध्ये एअर शो पाहण्यासाठी लाखोंची गर्दी; उन्हामुळे चौघांचा मृत्यू, २३० जण पडले बेशुद्ध
चेन्नईमध्ये एअर शो पाहण्यासाठी लाखोंची गर्दी; उन्हामुळे चौघांचा मृत्यू, २३० जण पडले बेशुद्ध (MK Stalin - X)

Chennai Air Force Show : चेन्नईतील भारतीय हवाई दलाचा एअर शो पाहण्यासाठी रविवारी मरीना बीचवर लाखो लोक जमले होते. यावेळी उष्णतेमुळे आणि डिहायड्रेशनमुळे चार जणांचा मृत्यू झाला, तर २३० पेक्षा अधिक नागरिक बेशुद्ध पडले. अचानक झालेल्या या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला. आजारी नागरिकांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

. या घटनेत श्रीनिवासन (४८,रा.पेरुंगलाथूर), कार्तिकेयन (३४) तिरुवोट्टीयुर आणि जॉन (५६) रा.कोरुकुपेट अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या एअर शोमध्ये लढाऊ विमानांचे थरारक प्रदर्शन पाहण्यासाठी सकाळी ११ वाजल्यापासूनच प्रेक्षकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी हातात छत्री घेतली होती.

उन्हामुळे आणि गर्दीने घेतला चौघांचा बळी

वेलचेरी येथील लाईटहाऊस मेट्रो स्टेशन आणि चेन्नई एमआरटीएस रेल्वे स्थानकावर शेकडो लोकांनी गर्दी केल्याने अनेकांना प्लॅटफॉर्मवर उभे राहण्यासाठी पाय ठेवायला देखील जागा नव्हती. मरीना बीचवर चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती तयार झाली होती. त्यात उष्ण हवामानामुळे सुमारे २३० पेक्षा अधिक लोक बेशुद्ध झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिक ऐवढ्या मोठ्या प्रमाणात एयर शो पाहण्यासाठी जमले होते की बीचवर पाय ठेवण्यासाठी देखील जागा नव्हती. तीन रुग्णवाहिका रुग्णालयात तातडीने पोहोचाव्यात यासाठी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना पुढाकार घ्यावा लागला. शहराच्या विविध भागांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाली होती. हिया वाहने तासंतास एकाच ठिकाणी अडकून पडली होती. शहरात वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला होता.

काही स्थानिक नागरिकांनी सांगितले की, एमआरटीएस ट्रेनने चिंताद्रीपेटला जाणे अशक्य होते, कारण वेलचेरी स्टेशनवर एअर शो पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. या ठिकाणी पाय ठेवायला देखील जागा नव्हती.

गरुड कमांडोच्या कसरतींनी 'एयर शो'ला सुरुवात

भारतीय वायुसेनेच्या विशेष गरुड दलाच्या कमांडोंनी बंधकांची सुटका करण्यासाठी मॉक ऑपरेशनचे धाडसी कौशल्य दाखवून प्रात्यक्षिकाला सुरुवात केली. लाइट हाऊस आणि चेन्नई बंदर दरम्यान मरीना येथे आयोजित ९२ व्या एयर फोर्स दिना निमित्त एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह, हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन, राज्याचे विविध मंत्री, चेन्नईच्या महापौर आर. प्रिया आणि इतर अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.

आकाश निरभ्र असल्याने भारतीय हवाई दलाच्या विमानांनी केलेला एअर शो नेत्रदीपक होता. दुपारी १ वाजता शोच्या शेवटी वालुकामय समुद्रकिनाऱ्यावर जमलेल्या लोकांनी या कसरतींची छायाचित्रे टिपली. सुमारे ७२ विमानांनी या हवाई प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. या एयरशोची नोंद 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये होणार आहे. सुपरसोनिक लढाऊ विमान राफेलसह जवळपास ५० लढाऊ विमाने एकत्र येऊन आकाशात विविध कसरती त्यांनी सादर केल्या. या एयर शोमध्ये डकोटा आणि हार्वर्ड, तेजस, एसयू-30 आणि सारंग य लढाऊ विमानांनी देखील चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या.

तब्बल २१ वर्षांनंतर चेन्नईत झालेल्या हवाई प्रात्यक्षिकात देशाची शान आणि अत्याधुनिक तेजस आणि हेलिकॉप्टर प्रचंड यांनीही सहभाग घेतला. सर्वात मोठा एअर शो आणि त्याचे भव्य प्रदर्शन म्हणून या शोची लिमका बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. हा शो १५ लाख लोकांनी पाहिला, गेल्या २१ वर्षांनंतर मरीना येथे झालेल्या एअर शोमध्ये झालेली ही उच्चांकी गर्दी होती. यापूर्वी २००३ मध्ये येथे येथे एयर शो झाला होता. यावे कार्यक्रम झाला होता आणि १३ लाख लोकांनी तो पाहिला होता.

भारतीय वायुसेनेच्या ९२ व्या वर्धापनदिन

भारतीय वायुसेनेच्या ९२ व्या वर्धापनदिनानिमित्त चेन्नईच्या जनतेने शानदार एअर शो पाहिला. १५ लाखांहून अधिक लोकांनी देशातील हवाई योद्ध्यांचे रंगीबेरंगी आणि नेत्रदीपक चित्तथरारक प्रदर्शन पाहिले. या एयर शोमध्ये ७२ हून अधिक विमानांचा समावेश होता. ईस्ट कोस्ट रोडवरील कोवलम पासून ते एन्नोरच्या उत्तर उपनगरापर्यंत संपूर्ण किनारपट्टी आणि उंच इमारतींवर नागरिक हा एयर शो पाहण्यासाठी जमले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर