मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून गर्भवती महिलेने केली आत्महत्या, मात्र पती होता जिवंतच

पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून गर्भवती महिलेने केली आत्महत्या, मात्र पती होता जिवंतच

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 05, 2024 06:42 PM IST

Pregnant Woman suicide after husband Death : पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून गर्भवती पत्नीने आत्महत्या केली. मात्र चार दिवसानंतर समजले की, तिचा पती जिवंत आहे. ही घटना भुवनेश्वरमध्ये घडली आहे.

Pregnant Woman suicide after husband Death
Pregnant Woman suicide after husband Death

ओडिशा राज्यातील भुवनेश्वर शहरात ३१ डिसेंबर रोजी एका रुग्णालयाच्या एसी काँप्रेसरच्या स्फोटात एक मॅकेनिकचा मृत्यू झाला होता. मॅकेनिकच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याच्या गर्भवती पत्नीने आत्महत्या केली. मात्र एक आठवड्यानंतर समजले की, या अपघातात तिचा पती नव्हे तर दुसऱ्याच व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेच्या कुटूंबीयांना धक्का बसला आहे. गर्भवतीच्या सासूने आपल्या सुनेच्या मृत्यूसाठी रुग्णालय प्रशासनास जबाबदार धरले आहे. दरम्यान ज्या व्यक्तीला आता मृत घोषित केले आहे, त्याच्या वडिलांनी दु:ख व्यक्त केले की, ते त्यांच्या मुलाचे अंतिम दर्शनही घेऊ शकले नाहीत. कारण  दिलीप समजून त्याचे अंतिम संस्कार केले गेले. 

रुग्णालयाने म्हटले आहे की, मृतदेह पूर्णपणे जळाल्याने ओळखणे अवघड झाले होते. दुसरीकडे ज्या कर्मचाऱ्याकडे मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम दिले होते, त्याने म्हटले आहे की, मी केवळ नाव सांगितले होते. ओळख पटवली नव्हती.

भुवनेश्वरमधील या  हाय-टेक हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचे मालक बीजेडी नेते तिरुपती पाणीग्रही आहेत. या रुग्णालयात ३१ डिसेंबर रोजी एसी काँप्रेसरचा स्फोट झाला होता. त्यामध्ये  एका मॅकेनिकचा मृत्यू झाला होता. मृताचे नाव दिलीप समांत्रे असल्याचे समजून त्याच्या घरी बातमी पोहोचवली होती. दिलीपची २४ वर्षीय पत्नी सौम्यश्री जेना गर्भवती होती. पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून तिला धक्का बसला व तिने आपल्या वडिलांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, ३१ डिसेंबर रोजी झालेल्या स्फोटात ज्याचा मृत्यू झाला होता ते दिलीप समांत्रे नव्हते तर ज्योती रंजन मलिक होता. मृतदेह पूर्णपणे जाळाल्याने ओळख पडली नाही. हाय-टेक हॉस्पिटलच्या सीईओ स्मिता पाढी यांनी सांगितले की, कंप्रेसर ब्लास्टमध्ये एकूण चार लोक गंभीररित्या भाजले होते, त्यापैकी दोन ९० टक्के भाजले होते. सीमांचल बिश्वास,  श्रीतम साहू, ज्योतिरंजन मलिक आणि दिलीप समांत्री अशी त्यांनी नावे आहेत. त्यापैकी श्रीतम साहू यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला आहे. 

गुरुवारी सायंकाळी एक गंभीर भाजलेला रुग्ण व्हेंटिलेटरवरून उठून परत आला व उपचारांना प्रतिसाद देऊ लागल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. आतापर्यंत ज्याच्यावर ज्योती रंजन मलिक समजून उपचार केले जात होते तो दिलीप समांत्रे होता. डॉक्टरांनाही तो आपले नाव दिलीप असल्याचे सांगू लागला. रुग्णालय प्रशासन संभ्रमात पडल्यानंतर त्यांनी याची माहिती मानसोपचार तज्ज्ञ अमृत पत्ताजोशी यांना दिली. त्यानंतर डॉक्टर अमृत यांनी रुग्णाला त्याच्या नातेवाईकांची नावे विचारली. ती त्याने बरोबर सांगितली. त्यानंतर त्याच्या कुटूंबीयांना बोलावले गेले. या लोकांशी बोलतानाही रुग्णाने सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली. इतकेच नव्हे तर त्याने आपल्या पुतणीलाही ओळखले. त्यानंतर रुग्णालयाला समजले की, जो मृत होता तो ज्योती रंजन मलिक होता.

WhatsApp channel

विभाग