उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात शुक्रवारी ह्रदय पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. फरीदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवादा बिलसांडी गावात झोपडीला आग लागली. ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. यात चार चुलत बहिणींचा मृत्यू झाला आहे. तीन बहिणींचा जागीच मृत्यू झाला. तर एक मुलगी गंभीररित्या भाजली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या बहिणींचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आगीत एक महिलाही अडकली होती, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाव नवादा बिलसंडी येथे रामदास यांचे घर आहे. त्यांनी घराच्या छतावर झोपडी बनवली होती. घरात रामदास, त्यांची तीन मुले अर्जुन, अमिताभ व भीम रहात होते. छतावर एका बाजुला गवत ठेवले होते. दुपारच्या वेळी या गवताला आग लागली. यावेळी कुटूंबातील लोक बाहेर गेले होते. छतावर तीन भावांच्या चार मुली लपाछपी खेळत होत्या.
गवताला लागल्या आगीपासून वाचण्यासाठी मुली झोपडीत जाऊन लपल्या. जळत्या गवताच्या गंजीने झोपडीलाही आपल्या कवेत घेतले. चार मुलींच्या ओरड्याच्या आवाजाने शेजारचे लोक घटनास्थळी आले. त्यांनी आग विझवली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
वेश्याव्यवसाय रॅकेटप्रकरणी भाजपा नेत्याला अटक, ६ अल्पवयीन मुलींची पोलिसांकडून सुटका
भीम यांची मुलगी प्रियांशी (५), अमिताभ यांची मुलगी मानवी (३), अर्जुन यांची मुलगी नैना (५) यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर अमिताभ यांची दुसरी मोठी मुलगी नीतू (६) गंभीररित्या जखमी झाली होती. उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.
या घटनेमुळे संपूर्ण उत्तर प्रदेशमधून हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या