मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राजीव गांधींच्या मारेकऱ्याचा त्यांच्याच नावाच्या हॉस्पिटलमध्ये झाला मृत्यू; अनेक दिवसांपासून होता आजारी

राजीव गांधींच्या मारेकऱ्याचा त्यांच्याच नावाच्या हॉस्पिटलमध्ये झाला मृत्यू; अनेक दिवसांपासून होता आजारी

Feb 28, 2024 01:58 PM IST

rajiv gandhi killer santhan dies in hospital : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मारेकरी संथन यांचा राजीव गांधी रुग्णालयात मृत्यू झाला. बुधवारी सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

rajiv gandhi
rajiv gandhi

rajiv gandhi killer santhan dies in hospital : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मारेकरी संथन याचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावावर असलेल्या चेन्नईच्या सरकारी रुग्णालयात संथनचा मृत्यू झाला. राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी संथन याला कोर्टाने दोषी ठरवले होते, मात्र, नंतर त्याची सुटका करण्यात आली होती. ५५ वर्षीय संथन हा जानेवारी पासून यकृत निकामी झाल्याने आजारी होता. त्यामुळे त्यांना राजीव गांधी सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

ट्रेंडिंग न्यूज

a m khanwilkar :मुंबईकर मराठी माणूस झाला भारताचा लोकपाल; देशाच्या पंतप्रधानांचीही करू शकतात चौकशी

हॉस्पिटलचे डीन डॉ. ई थेरनीराजन यांनी सांगितले की, संथनला दाखल केल्यापासून त्याची प्रकृती चिंताजनक होती. यानंतर, त्यांच्या आजारपणामुळे त्यांना बुधवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ते म्हणाले की हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुरुवातीला वाटले होते की संथन बरे होतील, परंतु त्यांना वाचवता आले नाही. राजीव गांधी हत्येप्रकरणी संथनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, जी नंतर जन्मठेपेत बदलण्यात आली. एवढेच नाही तर नोव्हेंबर २०२२ मध्येच संथनसह इतर ५ आरोपींना सोडण्यात आले होते. सर्व आरोपी सुमारे ३२ वर्षांपासून तुरुंगात होते.

, सुटका झाल्यानंतरही आरोपींना त्रिची सेंट्रल जेलच्या विशेष कॅम्पसमध्ये ठेवण्यात आले होते. सर्व आरोपी मूळचे श्रीलंकेचे नागरिक होते. त्यांच्याकडे ना पासपोर्ट होता ना प्रवासाची कागदपत्रे. संथनने मद्रास हायकोर्टात अर्ज दाखल करून त्याला त्याच्या वृद्ध आईला भेटायचे असल्याने त्याला श्रीलंकेला पाठवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. मात्र, यावर काही निर्णय होण्यापूर्वीच संथनचे दीर्घ आजाराने निधन झाले.

WhatsApp channel
विभाग