K. Kasturirangan : इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे निधन; राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात होते योगदान
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  K. Kasturirangan : इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे निधन; राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात होते योगदान

K. Kasturirangan : इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे निधन; राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात होते योगदान

HT Marathi Desk HT Marathi
Updated Apr 25, 2025 03:43 PM IST

kkasturirangan : ऑगस्ट २००३ मध्ये निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी नऊ वर्षे इस्रोचे अध्यक्ष पद भूषविले होते. एप्रिल २००४ ते २००९ या काळात ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज, बेंगळुरूचे संचालक होते.

के. कस्तुरीरंगन
के. कस्तुरीरंगन

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे आज (शुक्रवार, २५ एप्रिल) सकाळी बंगळुरू येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत, अशी माहिती कौटुंबिक सूत्रांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून ते वयोमानाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव रामन रिसर्च इन्स्टिट्यूट /येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

आज सकाळी बंगळुरू येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव २७ एप्रिल रोजी रमण रिसर्च इन्स्टिट्यूट (आरआरआय) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. महत्त्वाकांक्षी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा (एनईपी) मसुदा तयार करणाऱ्या मसुदा समितीचे माजी इस्रो प्रमुख अध्यक्ष होते. एनईपीमध्ये सूचीबद्ध शैक्षणिक सुधारणांचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे कस्तुरीरंगन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती आणि कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.

राज्यसभा सदस्यही राहिले आहेत -

कस्तुरीरंगन हे संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभेचे ही सदस्य होते. २००३ ते २००९ या काळात ते या सभागृहाचे सदस्य होते. तत्कालीन नियोजन आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. कस्तुरीरंगन एप्रिल २००४ ते २००९ या काळात बंगळुरूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीजचे संचालक होते.

पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित -

इस्रोच्या माजी प्रमुखांचा जन्म २४ ऑक्टोबर १९४० रोजी केरळमधील एर्नाकुलम येथे सीएम कृष्णस्वामी अय्यर आणि विशालाक्षी यांच्या पोटी झाला. मूळचे तामिळनाडूचे असलेले त्यांचे कुटुंब त्रिशूर जिल्ह्यातील चालाकुडी येथे स्थायिक झाले होते. त्यांची आई पलक्कड अय्यर कुटुंबातील होती. ऑगस्ट २००३ मध्ये निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी नऊ वर्षे इस्रोचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या अनुकरणीय कार्याबद्दल त्यांना २००० साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर