मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sushil Modi : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sushil Modi : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 14, 2024 12:02 AM IST

Sushil Modi Passes Away : बिहारचे माजी उप मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी रात्री निधन झाले. दिल्लीतील एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते कॅन्सरने त्रस्त होते.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन

sushil modi  passes away : जवळपास अडीच दशके बिहारमध्ये भाजपचे नेतृत्व करणारे व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री  सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगांशी झुंजत होते. दिल्लीतील एम्समध्ये त्यांच्यावर  उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे सोमवार रात्री उशिरा निधन झाले. त्यांचे पार्थिव शरीर मंगळवारी पाटण्यात आणले जाईल. प्रदेश भाजपा अध्यक्ष यांच्यासह उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी व भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या निधनाने पक्षाची कधीही भरून न येणारी हानी झाल्याचे म्हटले आहे. तसेच माजी मंत्री आणि आरजेडी नेते तेज प्रताप यादव यांनीही सुशील मोदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सुशील कुमार मोदी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते बिहारमधील भाजपचे वरिष्ठ नेत्यांपैकी एक होते. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी एक्स वर पोस्ट करून सुशील कुमार मोदी यांच्या निधनाची माहिती दिली आहे. सम्राट चौधरी यांनी म्हटले की, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांना त्यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली. बिहार भाजपचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

स्वत: दिली होती कर्करोग झाल्याची माहिती -

दरम्यान सुशील कुमार मोदी यांनी ३ एप्रिल रोजी स्वत:ला कर्करोग झाल्याची माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, गेल्या ६ महिन्यांपासून मी कर्करोगाशी झुंज देत आहे. आता मला वाटले की लोकांना सांगायची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत मी काहीही करू शकणार नाही. सर्व काही पंतप्रधानांना सांगितले आहे. देश, बिहार आणि पक्षासाठी नेहमीच समर्पित आणि कृतज्ञ.

सुशील कुमार मोदी यांचे राज्यसभेतील सदस्यत्व यावर्षीच संपले होते. भाजपने त्यांना पुन्हा राज्यसभेचा खासदार न बनवल्याने ते लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यांनी पोस्ट केल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. गेल्या काही दिवसापासून ते सार्वजनिक जीवनात दिसले नव्हते.

विद्यार्थी दशेपासून सार्वजनिक जीवनात -

सुशील कुमार मोदी यांचा बिहारच्या राजकारणात मोठा दबदबा होता. विद्यार्थी दशेपासून ते सक्रिय राजकारणात आले होते. १९९० मध्ये ते बिहार विधानसभेत पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर १९९५ आणि २००० मध्येही ते आमदार झाले. म्हणजेच ते सलग तीन वेळा आमदार होते. १९९५ मध्ये सुशील कुमार मोदी हे भाजपाचे चीफ व्हिप बनले होते. तसेच, १९९६ ते २००४ पर्यंत सुशील कुमार मोदी हे बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. मागील वेळी नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते.

IPL_Entry_Point

विभाग