Changodar Gujarat Crime News Marathi : एका घरात चोरी केल्याच्या संशयातून विदेशी तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातच्या अहमदाबादेतील चांगदोरमध्ये ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात १० आरोपींना अटक केली आहे. जमावानं केलेल्या बेदम मारहाणीत विदेशी तरुणाचा मृत्यू झाला असून या घटनेमुळं संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ शूट करत त्याला सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. मृत्यू झालेला तरुण हा नेपाळचा रहिवासी असून तो चांगदोरमध्ये वॉचमन म्हणून काम करत होता. त्यानंतर आता अहमदाबाद पोलिसांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या अहमदाबादलगत असलेल्या चांगदोर डीएमआयसीमध्ये नेपाळी तरुण एका कंपनीत वॉचमन म्हणून काम करत होता. सोमवारी रात्री काम संपवून तो घराच्या दिशेनं निघाला असता त्याच्यावर काही लोकांनी अचानक हल्ला सुरू केला. चोर असल्याचा संशय येताच परिसरातील आणखी लोक तिथं आले आणि त्यांनी नेपाळी तरुणाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नेपाळी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याशिवाय सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर तब्बल १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...
चोरीच्या संशयावरून जमाव नेपाळी तरुणाला मारहाण करत असताना तिथं उपस्थित असलेले लोक त्याला न वाचवता फक्त तमाशा बघत राहिले. याशिवाय काही लोकांनी मारहाणीचा व्हिडिओ शूट करत त्याला सोशल मीडियावर व्हायरल केलं. त्यानंतर आता या प्रकरणात सायबर पोलिसांनीही कारवाई करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या