Pune hotel viral News : चंदीगड येथील अल्टरनेटिव्ह मेडिसीन प्रॅक्टिशनर डॉ. अजयिता यांना नुकताच पुण्यातील एका नामांकित फाइव्हस्टार हॉटेलमध्ये अत्यंत वाईट अनुभव आला. या हॉटेलमध्ये प्रचंड अस्वच्छता व घाण होती. तसेच हॉटेलमध्ये चेक-इन केल्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता हॉटेल व्यवस्थपणाने त्यांची रूम परस्पर बदलली. एवढेच नाही तर त्यांच्या रूममध्ये आधी वापरण्यात आलेल्या वस्तु देखील ठेवण्यात आल्या होत्या. या साठी हॉटेल व्यवस्थापनाने दिलगिरी देखील व्यक्त केली नाही. हा संपूर्ण अनुभव त्यांनी सोशल मिडियावर शेअर केला असून, त्यांची पोस्ट व्हायरल झाली आहे. हॉटेलच्या अशा उर्मट वागण्यामुळे त्यांना जुळवून घेण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नव्हता असे देखील त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
डॉ. अजयिता यांनी सोशल मिडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की. त्या पुण्यातील एका हॉटेलमध्ये थांबण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी रूम बूक केली होती. दरम्यान, हॉटेलमध्ये चेक इन केल्यावर त्या हॉटेलच्या स्पामध्ये गेल्या. त्या स्पामधून परत त्यांच्या रूममध्ये गेल्या. त्या ठिकाणी रूममध्ये असलेल्या कंगव्यांचे पॅकेट त्यांनी फोडले. यावेळी त्यात पूर्वी वापरलेला कंगवा त्यांना आढळला. तसेच रूममध्ये ठेवण्यात आलेल्या टुथब्रश देखील आधीच वापरला असल्याचे त्यांना आढळले. वापरलेला टुथ ब्रश हॉटेल व्यवस्थापनाने ठेवल्याने त्यांचा संताप झाला. हा प्रकार अत्यंत घृणास्पद, अस्वच्छ आणि किळसवाणा असल्याचं त्यांनी म्हटलं पोस्टमध्ये लिहिलं आहे.
या घटनेनंतर डॉ. अजयिता यांनी या प्रकरणी हॉटेलच्या जनरल मॅनेजरकडे तक्रार करत संताप व्यक्त केला. यावर त्यांचा प्रश्न सोडवण्या ऐवजी, हॉटेल मॅनेजरने त्यांच्याशी उद्धट वर्तन केलं. त्यांनी त्यांच्याशी आवाज चढवून संवाद साधला. या समस्येकडे त्यांनी लक्ष देण्याऐवजी व रूमसर्व्हिसला दोषी ठरवण्या एवजी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली.
मोठा मनस्ताप झाल्याने त्यांनी हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर पोस्ट करेन असे हॉटेल मॅनेजरला सांगितले. यामुळे हॉटेलला प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो असे देखली त्यांनी मॅनेजरला सांगितले. मात्र, मॅनेजरने उर्मटपणे उत्तर देत डॉ. अजयिता यांना, "तुम्हाला जे हवं ते कर, मला काय करायचं आहे ते मी बघेन! असे उत्तर दिले. यावेळी त्यांनी हॉटेलमधील अस्वच्छतेचे फोटो काढून ठेवले होते. ते देखील मॅनेजरला दाखवले. यामुळे मॅनेजरची आणखी चिडचिड झाली.
यानंतर त्यांनी या संपूर्ण प्रकार सोशल मिडियावर पोस्ट केला. यात त्यानी हॉटेलचा उल्लेख करत शून्य स्वच्छतेचे मानक! वापरलेल्या वस्तु पुन्हा दुसऱ्या ग्राहकांना देणारे व खराब सोयी-सुविधा असलेले पंचतारांकित हॉटेल तसेच ग्राहकांची पिळवणूक करणारा महाव्यवस्थापक? अस्वीकार्य!" "हे तुमच्या हॉस्पिटॅलिटीचंन स्टँडर्ड आहे का?" असा प्रश्न देखील डॉ. अजयिता यांनी केला आहे.
डॉ. अजयिता यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी देखील त्यांचे याच हॉटेलमधील अनुभव शेअर केले आहेत. एका यूझरने लिहिलं की, "मी गेल्या महिन्यात या हॉटेलमध्ये राहिलो होतो. मी चेक इन करताच आणखी एका जोडप्याने दरवाजा उघडला आणि खोलीत प्रवेश केला!! त्यांनी अद्याप चेक आऊट केले नव्हते आणि मला तीच खोली राहण्यास देण्यात आली होती.
दिल्लीतील हॉटेलची चैन असलेल्या या हॉटेलचा उल्लेख करत आणखी एका यूझरने लिहिलं की, "मला माझ्या बेसिनमध्ये थुंकीचे डाग आढळले आणि टॉयलेटच्या बाजूला काही वापरलेले साबण सापडले. ते उचलण्यात आले नव्हते. व रूम देखील साफ करण्यात आलेली नव्हती. खोलीत जमिनीवर फिरणारी पाल आढळली असून याबाबत तक्रार केली तेव्हा त्यांनी मदत करण्या एवजी उद्धट वागणूक दिली, असे एका युजरने जयपूरमधील याच हॉटेलमधील अनुभव कथन केला.
संबंधित बातम्या