pakistan army : पाकिस्तानला २५ वर्षांनंतर उपरती! कारगिल युद्धात हात असल्याचं सत्य अखेर स्वीकारलं-for the first time pakistan army admits role in kargil war against india ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  pakistan army : पाकिस्तानला २५ वर्षांनंतर उपरती! कारगिल युद्धात हात असल्याचं सत्य अखेर स्वीकारलं

pakistan army : पाकिस्तानला २५ वर्षांनंतर उपरती! कारगिल युद्धात हात असल्याचं सत्य अखेर स्वीकारलं

Sep 07, 2024 07:49 PM IST

pakistan army admits role in kargil war : १९९९ मध्ये भारताविरुद्धच्या कारगिल युद्धात पाकिस्तानने आपला सहभाग असल्याचे प्रथमच मान्य केलं आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी संरक्षण दिनाच्या कार्यक्रमात संबोधित करताना ही कबुली दिली.

पाकिस्तानला २५ वर्षानंतर उपरती! कारगिल युद्धात हात असल्याचं सत्य अखेर स्वीकारलं
पाकिस्तानला २५ वर्षानंतर उपरती! कारगिल युद्धात हात असल्याचं सत्य अखेर स्वीकारलं

pakistan army admits role in kargil war : पाकिस्तानला तब्बल २५ वर्षांनंतर उपरती झाली आहे. कारगिल युद्धात सहभाग असल्याचं पाकिस्तानने अखेर मान्य केलं आहे. पाकिस्तानी लष्कराने प्रथमच याची जाहीरपणे कबूल दिली आहे. १९९९ च्या भारताविरुद्धच्या कारगिल युद्धात त्यांचा सहभाग असल्याचं संरक्षण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी मान्य केलं आहे.

त्यांनी भारतासोबतच्या वेगवेगळ्या युद्धांमध्ये मारल्या गेलेल्या पाकिस्तानी सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. या युद्धांमध्ये कारगिल युद्धाचाही समावेश होता. याआधी दोन दशकांहून अधिक काळ पाकिस्तान या संदर्भात हात असल्याचं नाकारलं होतं. मात्र, त्याने आता याची अधिकृत कबुली दिली आहे.

आपल्या भाषणादरम्यान जनरल मुनीर म्हणाले, "पाकिस्तानी नागरिक शूर आहेत. ते त्यांच्या स्वातंत्र्याची कदर करतात व देशाच्या स्वातंत्र्यासाठी व सर्वभौमत्वासाठी काहीही करण्यास तयार असतात. मुनिर म्हणाले, १९४८, १९६५, १९७१असो किंवा १९९९ चे कारगिल युद्ध असो, हजारो जवानांनी देश आणि इस्लामसाठी बलिदान दिले आहे. हे विधान पाकिस्तानकडून बऱ्याच दिवसांपासून देण्यात येत असलेल्या अधिकृत विधानांपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. कारगिल युद्धाबाबत पाकिस्तान आजपर्यंत म्हणत आला आहे की हा हल्ला अतिरेक्यांनी केला होता आणि ज्यांना ते मुजाहिदीन म्हणतात.

पाकिस्तानला लाज वाटली

जनरल मुनीर यांच्या या वक्तव्याने पाकिस्तानने कारगिलमध्ये पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले आहे. या युद्धादरम्यान पाकिस्तानी लष्कराने काश्मीरमधील मोक्याच्या ठिकाणांवर कब्जा केला होता, त्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत पाकिस्तानचा दारुण पराभव झाला, त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना कारगिल सेक्टरमधून सैन्य मागे घेण्याचे आदेश देण्यास भाग पाडले.

कारगिल युद्धात पाकिस्तानचा हात असल्याचे भारताकडे अनेक पुरावे

कारगिल युद्ध हा पाकिस्तानी लष्कराचा थेट हल्ला होता, असे भारताने सातत्याने म्हणत आला आहे. दहशतवाद्यांना कवच म्हणून घेत पाकिस्तानी लष्कराने कारगिलमध्ये घुसखोरी केली. जनरल मुशर्रफ (त्यांच्या बीजिंग भेटीदरम्यान) आणि त्यांचे चीफ ऑफ जनरल स्टाफ लेफ्टनंट जनरल मोहम्मद अझीझ यांच्यातील रावळपिंडीत २६ मे आणि २९ मे रोजी झालेल्या संभाषणातून हे स्पष्ट झालं आहे.

Whats_app_banner