मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Imran khan Firing : हल्लेखोराने इम्रान खानवर गोळीबार केल्यानंतर रॅलीमध्ये गोंधळ, पाहा VIDEO

Imran khan Firing : हल्लेखोराने इम्रान खानवर गोळीबार केल्यानंतर रॅलीमध्ये गोंधळ, पाहा VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 03, 2022 07:55 PM IST

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर आज एका रॅलीदरम्यान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

गोळीबार केल्यानंतर रॅलीमध्ये गोंधळ
गोळीबार केल्यानंतर रॅलीमध्ये गोंधळ

पाकिस्तानच्या पूर्व प्रांतात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर एका रॅलीदरम्यान गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पक्षाच्या प्रवक्त्याने सांगितलेआहे. ते म्हणाले, गोळी इम्रान खान यांच्या पायाला लागली आहे. त्यांना लाहोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माजी अर्थमंत्री आणि इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते असद उमर यांनी त्यांच्याबद्दलची सर्व माहिती एका टीव्ही वाहिनीला दिली. दुसरीकडे, पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने माजी पंतप्रधानांना त्यांच्या कंटेनरमधून बाहेर काढून कारमध्ये हलवण्यात आल्याचे दाखवले. त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते रऊफ हसन यांनी सांगितले की, इम्रान खान जखमी झाले असून सविस्तर माहिती उपलब्ध नाहीत.

जखमी झाल्यानंतर इम्रान खान यांची पहिली प्रतिक्रियाही समोर आली आहे. तो म्हणाला, अल्लाहने मला दुसरे जीवन दिले आहे. या हल्ल्यात पीटीआयचे खासदार फैसल जावेद हेही जखमी झाले आहेत. त्याचवेळी हल्लेखोराचा फोटोही समोर आला आहे. तो बंदूक उचलून गोळीबार करताना दिसत आहे. अनेक वृत्तांमध्ये असेही बोलले जात आहे की, हल्लेखोरही मारला गेला आहे. मात्र याची पुष्टी झालेली नाही.

 

या घटनेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अनेक ट्विट करून हल्ल्याचा निषेध केला. शरीफ म्हणाले की, पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. या घटनेचा तात्काळ अहवाल देण्याचे आदेश गृहमंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी अल्लाहकडे प्रार्थना करतो. या घटनेची चौकशी व्हावी यासाठी सरकार पूर्ण मदत करेल. देशाच्या राजकारणात हिंसेला स्थान नसावे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की,या घटनेबाबत अद्याप फारशी माहिती नाही पण त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.पाकिस्तानी पत्रकार इहतिशाम-उल-हक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती गोळीबार करताना दिसत आहे. त्याने खालून इम्रान खानवर निशाणा साधला. एका व्हिडिओमध्ये तीन गोळ्या ऐकू येत आहेत. इम्रान खान इस्लामाबादमध्ये सध्याच्या सरकारविरोधात निदर्शने करत असताना हा हल्ला झाला.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या