मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Zomato: झोमॅटोनं नॉनव्हेज पदार्थांची डिलिव्हरी थांबवली, कारण काय?

Zomato: झोमॅटोनं नॉनव्हेज पदार्थांची डिलिव्हरी थांबवली, कारण काय?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 23, 2024 07:00 PM IST

Zomato Stopped Nonveg items: झोमॅटोने देशातील अनेक राज्यात नॉन व्हेज पदार्थांची डिलिव्हरी थांबवली आहे.

Zomato
Zomato

Zomato News : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मांसाहारी पदार्थांची डिलिव्हरी तात्पुरती थांबवली. अनेक शहरांमधील अ‍ॅप वापरकर्त्यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या समस्या मांडल्या. त्यानंतर कंपनीने त्यामागचे कारण सांगितले.

ट्वीटरवर वापरकर्त्यांनी केलेल्या तक्रारी आणि त्यांच्या समस्यांना उत्तर देताना झोमॅटोने सांगितले की, सरकारकडून मिळालेल्या सूचना लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकमुळे सरकारने या सूचना दिल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

"सरकारकडून मिळालेल्या सूचनांमुळे आम्ही उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मांसाहारी वस्तूंची डिलिव्हरी थांबवली होती," असे कंपनीने आपल्या निवेदनात सांगितले आहे. आशा आहे की हे उत्तर मदत करेल, एका वापरकर्त्याला उत्तर देताना कंपनीने म्हटले आहे. खरंतर एका वापरकरत्याने विचारले होते की, झोमॅटोवरून मांसाहार का ऑर्डर करू शकत नाही.

२२ जानेवारीला सूचना प्राप्त झाल्या होत्या. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख वरुण खेरा यांनी उत्तर प्रदेशसाठी सांगितले होते की, २२ जानेवारी रोजी राज्यातील सर्व रेस्टॉरंटमध्ये फक्त शाकाहारी पदार्थच दिले जातील. अशा परिस्थितीत अन्न वितरणासाठीही अशी गोष्टी ठरवली गेली असण्याची शक्यता आहे. मात्र, झोमॅटोने याबाबत कोणतेही स्पष्ट कारण दिले नाही.

उत्तर प्रदेश सरकारने सोमवारी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी राज्यात मांस आणि मासे विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली. अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान लोकांच्या भावनांचा आदर करत दिल्लीतील सर्व कत्तलखाने, मांस आणि मासे विक्रीची दुकाने दिवसभर बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

WhatsApp channel

विभाग