मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Flipkart: सकाळी ऑर्डर करा अन् संध्याकाळपर्यंत वस्तू घरात; 'या' शहरांत फ्लिपकार्टची खास सुविधा

Flipkart: सकाळी ऑर्डर करा अन् संध्याकाळपर्यंत वस्तू घरात; 'या' शहरांत फ्लिपकार्टची खास सुविधा

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 01, 2024 04:24 PM IST

Flipkart launches same day delivery service: फ्लिपकार्ट आता एकाच दिवसांत ग्राहकांच्या ऑर्डरची डिलिव्हरी करणार आहे.

flipkart  HT
flipkart HT

Flipkart to soon offer same day delivery in these cities:ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. ई- कॉमर्स वेबसाईटवरून कोणत्याही वस्तूची ऑर्डर मिळवण्यासाठी ६-७ दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी खास सुविधा आणली आहे, ज्यामुळे ग्राहकांना एका दिवसांत वस्तूंची डिलिव्हरी मिळवता येणार आहे. फ्लिपकार्टने मेट्रो आणि नॉन- मेट्रो शहरांत ही सुविधा सुरू करण्याची योजना आखली आहे. दरम्यान, सुरुवातीला कोणकोणत्या शहरांत ही सुविधा मिळणार आहे? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला २० शहरांत ही सुविधा मिळणार आहे. या शहरांत अहमदाबाद, बंगळुरू, भुवनेश्वर, कोयंबटूर, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटीस, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोलकाता, लुधियाना, लखनौ, मुंबई, नागपूर, पुणे, पटणा, रायपूर, सिलिगुडी आणि विजयवाडा यांचा समावेश आहे. या शहरातील ग्राहकांनी दुपारी १ वाजेपर्यंत ऑर्डर केल्यास त्यांना रात्री १२ वाजेपर्यंत डिलिव्हरी मिळेल. ही सुविधा आजपासून सुरु झाली आहे. यानंतर संपूर्ण देशभरात ही सुविधा उपलब्ध केली जाईल, असा कंपनीने दावा केला आहे. फ्लिपकार्टच्या या सुविधाअंतर्गत मोबाईल, फॅशन, ब्यूटी प्रॉडक्ट, लाइफस्टाइल, पुस्तक, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या वस्तूंची ऑर्डर करता येणार आहे, जी एका दिवसांत डिलिव्हर केली जाईल.

महत्त्वाचे म्हणजे, फ्लिपकार्टवरून एका महिन्यात तब्बल १२ कोटींपेक्षा जास्त वस्तूंची डिलिव्हरी केली जाते. देशातील दुर्गम भागातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी फ्लिपकार्ट प्रयत्न करत आहे. फ्लिपकार्टने एकाच दिवशी वितरण सुविधा देण्यासाठी गेल्या एका वर्षात अनेक पूर्तता केंद्रांमध्ये गुंतवणूक केली. यामुळे प्लिपकार्टच्या ग्राहकांना चांगला फायदा झाला आहे.

फ्लिपकार्ट टेक्नोलॉजी सोल्यूशन्सवर काम करत आहे. ज्यामुळे ग्राहकांना कमी वेळेत डिलिव्हरी मिळवता येईल. याव्यतिरिक्त, डिलिव्हरी प्रक्रियेची कार्यक्षमता वाढवली जात आहे. तसेच जवळच्या पूर्तता केंद्राकडून ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आणि ट्रांझिट वेळ कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

WhatsApp channel

विभाग