Flipkart Republic Day Sale: लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टला भारतीय ग्राहकांची मोठी पसंती आहे. २०२४ मधील पहिल्या मोठ्या सेलची घोषणा फ्लिपकार्टने केली आहे. फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनापूर्वी घोषित करण्यात आला आहे. या सेलची अधिकृत तारीख देखील कंपनीने जाहीर केली आहे.
Flipkart च्या ग्राहकांसाठी रिपब्लिक डे सेल पुढच्या आठवड्यात १४ जानेवारीपासून सुरू होत आहे. हा सेल १९ जानेवारीपर्यंत सुरू राहील. या कालावधीत, ग्राहकांना अनेक उत्पादनांवर नो कॉस्ट इएमआयचा लाभ देखील मिळणार आहे. तर सुपर कॉईन्सद्वारे अतिरिक्त सवलतींचा लाभ देखील घेता येणार आहे. फ्लिपकार्ट अॅक्सीस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे.
फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांव्यतिरिक्त, आयसीआयसीआय बँक खातेधारकांना सेल दरम्यान मोठा फायदा मिळणार आहे. ICICI बँकेचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा कार्डलेस EMI व्यवहारांच्या बाबतीत, अनेक उत्पादनांवर १० टक्के झटपट कॅशबॅकचा लाभ दिला जाणार आहे. ग्राहकांना यानंतर पेमेंट करण्यासाठी Flipkart Pay Later सेवा देखील वापरता येणार आहे.
विक्रीदरम्यान दर ४ तासांनी रॉकेट डीलची घोषणा केली जाणार आहे. याशिवाय अनेक उत्पादने फ्लॅट किमतीच्या डीलसह सर्वात कमी किमतीत देखील सूचीबद्ध केली जाणार आहे. याशिवाय, जास्त खरेदीवर अधिक नफा देखील ग्राहकांना मिळणार आहे. उदाहरणार्थ, '३ वस्तु खरेदी करा, ५ टक्के सूट मिळवा' आणि '५ वस्तु विकत घ्या, ७ टक्के सूट मिळवा' अशा ऑफर देखील देण्यात येणार आहेत.
मर्यादित तासांच्या ब्रँड डील दररोज सकाळी १० ते दुपारी ४ आणि दुपारी ४ ते रात्री १० दरम्यान राहणार आहेत. फ्लिपकार्ट प्लस वापरकर्त्यांना २४ तास आधी सेलमध्ये प्रवेश मिळणार आहे. मिडरेंज ते प्रीमियम स्मार्टफोन सेलमध्ये सर्वात मोठ्या सवलतीत उपलब्ध होणार आहेत. सॅमसंग, मोटोरोला, ऍपल, गुगल आणि रियलमी फोनवर विशेष ऑफर सेल दरम्यान जाहीर केल्या जाणार आहेत.
संबंधित बातम्या