Motorola Smartphones: जर तुम्ही मोटोरोला फोन घेण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर सुरू असलेला एंड ऑफ सीझन सेल तुम्ही मिस करू शकत नाही. येत्या १३ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही मोटोरोलाचे हँडसेट बेस्ट डीलमध्ये खरेदी करू शकता. या सेलमध्ये मोटोरोलाच्या स्मार्टफोनवर दिल्या जाणाऱ्या टॉप ३ डील्सबद्दल जाणून घेऊयात.
मोटोरोला जी८५ 5G, मोटोरोला एज ५० फ्यूजन आणि मोटोरोला एज ५० प्रो 5G हे तिन्ही स्मार्टफोन ३ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटसह खरेदी करू शकता. याशिवाय, सेलमध्ये स्मार्टफोनवर कॅशबॅक आणि दमदार एक्स्चेंज बोनसही दिला जात आहे. लक्षात ठेवा एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट तुमच्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल.
मोटोरोला जी८५ 5G च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये तुम्ही याला १ हजार रुपयांच्या बँक डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. हा फोन ५ टक्के कॅशबॅकसह खरेदी केला जाऊ शकतो. या कॅशबॅकसाठी तुम्हाला फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील. एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्हाला १६ हजार ५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मोटोरोलाच्या या फोनमध्ये तुम्हाला ६.६७ इंचाचा फुल एचडी+ 3D कर्व्ड डिस्प्ले पाहायला मिळेल. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६ एस जेन ३ आहे. फोनचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा असून सेल्फी कॅमेरा ३२ मेगापिक्सलचा आहे.
१२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला मोटोरोला एज ५० फ्यूजन व्हेरियंट सेलमध्ये २४ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये तुम्हाला २ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या युजर्सला ५ टक्के कॅशबॅक देत आहे. फोनवर २३ हजार २०० रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस देखील आहे. या फोनमध्ये तुम्हाला ५० मेगापिक्सलचा रिअर आणि ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. फोनमध्ये कंपनी ६.७ इंचाचा कर्व्ड डिस्प्ले देत आहे. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७ एस जेन २ आहे.
मोटोरोला एज ५० प्रो 5G च्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेजसह ३१ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये तुम्ही या फोनला ३ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. कंपनी फोनवर ५ टक्के कॅशबॅक देखील देत आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या युजर्सना हा कॅशबॅक मिळणार आहे. फोनवर ३१ हजार ३०० रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर देखील दिली जात आहे. या फोनमध्ये तुम्हाला ६.७ इंचाचा १.५के डिस्प्ले पाहायला मिळेल. हा डिस्प्ले १४४ हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनची बॅटरी ४५०० एमएएचची असून १२५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनचा फ्रंट आणि रिअर कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे.