Motorola Edge 50 Pro: जर तुम्ही उत्तम सेल्फी कॅमेरा असलेला फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मोटोरोला एज ५० प्रो तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे, फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या एंड ऑफ सीझन सेलमध्ये तुम्ही हा फोन बेस्ट डीलमध्ये ५० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह खरेदी करू शकतात. फोनच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत ३१ हजार ९९९ रुपये आहे. १३ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये हा फोन ३ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे.
डिस्काऊंटसाठी अॅक्सिस किंवा आयडीएफसी बँकेच्या कार्डने (नॉन-ईएमआय ट्रान्झॅक्शन) पैसे द्यावे लागतील. फोन खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळेल. एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्हाला ३१ हजार ३०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. लक्षात ठेवा एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट तुमच्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल.
कंपनी या फोनमध्ये २७१२×१२२० पिक्सल रिझोल्यूशनसह ६.७ इंचाचा १.५ के पीओएलईडी डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये देण्यात आलेला हा डिस्प्ले १४४ हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी फोनमध्ये गोरिल्ला ग्लास 5 देखील ऑफर करत आहे.
हा मोटोरोला फोन १२ जीबी पर्यंत एलपीडीडीआर ४ एक्स रॅम आणि २५६ जीबी यूएफएस २.२ स्टोरेजसह येतो. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 पाहायला मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत.
यामध्ये ५० मेगापिक्सलचा मेन लेन्ससह १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि १० मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पाहायला मिळणार आहे.
फोनची बॅटरी ४५०० एमएएचची असून १२५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन ५० वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. ओएसबद्दल बोलायचे झाले तर फोन अँड्रॉइड १४ वर काम करतो. या फोनमध्ये तुम्हाला आयपी ६८ वॉटर आणि डस्ट रेझिस्टंट रेटिंग देखील मिळत आहे.
संबंधित बातम्या