मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Flipkart Big Billion Day Sale:यापेक्षा स्वस्त एलइडी मिळू शकतच नाही!,पाहा किती पैशात मिळतोय एलइडी TV?
एलइडी टिव्हीची प्रतिमा
एलइडी टिव्हीची प्रतिमा (हिंदुस्तान टाइम्स)

Flipkart Big Billion Day Sale:यापेक्षा स्वस्त एलइडी मिळू शकतच नाही!,पाहा किती पैशात मिळतोय एलइडी TV?

24 September 2022, 11:35 ISTDilip Ramchandra Vaze

Flipkart Big Billion Day Sale LED TV : फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये तुम्ही ५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत एलईडी टीव्ही खरेदी करू शकता. तसेच, एक्सचेंज ऑफरमध्ये पूर्ण एक्सचेंज बोनस मिळाल्यावर, तुम्ही ५४९ रुपयांमध्ये नवीन टीव्ही घरी आणू शकता.

जर तुम्ही एक नवा टिव्ही घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे. आपल्याला अत्यंत स्वस्तात चांगला एलइडी टिव्ही मिळावा असं प्रत्येकालाच वाटतं. सणांच्या निमित्ताने आता फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल आला आहे. त्यात तुम्हाला एलइडी टिव्ही अविश्वसनिय किमतीत मिळू शकणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेलमध्ये स्मार्टफोन्सव्यतिरिक्त एलईडी स्मार्ट टीव्हीवर बंपर सूटही दिली जात आहे. ३० सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही तुमच्यासाठी अगदी कमी किमतीत नवीन टीव्ही खरेदी करू शकता. सेलमध्ये उपलब्ध सर्वात स्वस्त टीव्ही ४ हजार ९९९ रुपये आहे. विशेष म्हणजे डिस्काउंट व्यतिरिक्त तुम्ही हे टीव्ही आकर्षक बँक आणि एक्सचेंज ऑफरमध्ये देखील खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या सेलमध्ये कोणते स्वस्त टीव्ही उपलब्ध आहेत.

Flipkart द्वारे MarQ 24 इंच HD रेडी LED TV (24HDNDQPPAB)

तुम्ही हा टीव्ही १४ हजार ९९९ रुपयांच्या एमआरपीसह येणारा टिव्ही ४ हजार ९९९ रुपयांच्या सेलमध्ये खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट ऍक्सीस बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक देखील मिळेल. तुम्ही हा टीव्ही एक्सचेंज ऑफरमध्येही घेऊ शकता. जुन्या टीव्हीच्या बदल्यात तुम्हाला संपूर्ण एक्सचेंज रक्कम मिळाल्यास, त्याची किंमत तुम्हाला ४ हजार ४५० रुपये जास्त लागू शकते.टीव्हीमध्ये कंपनी १३६६x७६८ पिक्सेल रिझोल्यूशनसह २४ इंचाचा एचडी रेडी डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले ६० हर्टझच्या रिफ्रेश रेटसह येतो. टीव्हीमध्ये मजबूत आवाजासाठी २४ वॅटचा साउंड आउटपुट देण्यात आला आहे.

Infinix ३२ इंच एचडी रेडी एलईडी स्मार्ट लिनक्स टीव्ही (32Y1)

Infinix च्या या टीव्हीची मूळ किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये, तुम्ही हा टिव्ही ७ हजार ९९९ रुपयांमध्ये डिस्काउंटनंतर खरेदी करू शकता. आयसीआयसीआय बँक कार्डलेस ईएमआय पर्यायासह टीव्ही खरेदी करून तुम्ही १७५० रुपयांपर्यंतची आणखी सूट मिळवू शकता. तुम्हाला ऍक्सीस बँक कार्ड पेमेंटवर अतिरिक्त १० टक्के सूट मिळू शकते. हा टीव्ही ६ हजार रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह तुमचाही असू शकतो. टीव्हीमध्ये कंपनी एचडी रेडी डिस्प्लेसह २० डब्ल्यू स्पीकर देत आहे.

KODAK 24 इंच HD रेडी LED NA TV (24HDX100S)

सेलमधील डिस्काउंटनंतर या कोडॅक टीव्हीची किंमत ५ हजार ९९९ रुपये झाली आहे. तुम्ही हा टीव्ही Infinix TV बँक ऑफरसह देखील खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये टीव्ही घेऊन तुम्हाला ५ हजार १७५ रुपयांपर्यंतचा अतिरिक्त फायदा मिळू शकतो. कंपनी या एंट्री-लेव्हल टीव्हीमध्ये ६० हर्टझ रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि २० वॅट साउंड आउटपुट देत आहे.

realme NEO 32 इंच HD रेडी एलईडी स्मार्ट लिनक्स टीव्ही (RMV2101)

२१ हजार ९९९ रुपयांची मूळ किंमत असलेला हा टीव्ही फ्लिपकार्टच्या ८ हजार ९९९ रुपयांच्या बिग बिलियन डे सेलमध्ये तुमचा असू शकतो. आयसीआयसीआय बँक कार्डलेस इएमआय अंतर्गत, तुम्हाला या टीव्हीवर १,७५० रुपयांपर्यंतची आणखी सूट मिळू शकते. तुम्हाला ऍक्सीस बँक क्रेडिट कार्ड पेमेंटवर आणखी १० टक्के सूट मिळू शकते. एक्सचेंज ऑफरमध्ये हा टीव्ही ८ हजार रुपयांपर्यंतच्या सूटसह तुमचाही असू शकतो. Linux OS वर चालणाऱ्या, या Infinix TV मध्ये एचडी रेडी डिस्प्ले आणि २० वॉट साउंड आउटपुट आहे.