Viral Video : फेंगल चक्रीवादळामुळे चेन्नई विमानतळावर मोठी विमान दुर्घटना टळली आहे. रविवारी इंडिगोच्या एका विमानाला लँडिंगमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
फेंगल चक्रीवादळामुळे चेन्नई येथील अनेक उड्डाणे रद्द केली आहे. मात्र, एक विमान या ठिकाणी लँड होणार होते. व्हायरल झालेल्या विमानाच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विमानाने धावपट्टीवर उतरण्यासाठी लँगिंड सुरू केले. विमानाचे मागील चाक धावपट्टीला लागताच वैमानिकाने तातडीने निर्णय घेत पुन्हा तातडीने विमानाचे उड्डाण केले. फेंगल चक्रीवादळामुळे जोरदार वारे आणि धावपट्टीवर पाणी साचल्याने पायलटला धावपट्टीवर लँडिंग करण्याचा निर्णय काही काळ पुढे ढकलावा लागला. वैमानिकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि त्याने घेतलेल्या तातडीच्या निर्णयामुळे त्याचं कौतुक केलं जात आहे.
एअरलाइन्सच्या भाषेत याला गो-अराउंड म्हणतात. जेव्हा लँडिंग सुरक्षितपणे पूर्ण होऊ शकत नाही तेव्हा या प्रकारच्या पद्धतीचा अवलंब करून वैमानिकाला निर्णय घ्यावा लागतो. या घटनेने पायलटची योग्य निर्णय घेण्याची क्षमता दाखवून दिली आहे.
पुद्दुचेरीजवळ धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाचा प्रभावामुळे मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह हवामान खराब झाले आहे. विशेत: चेन्नईत हवामान खराब झाले आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. या प्रतिकूल हवामानामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच विमानतळावरील कामकाज तात्पुरते थांबवन्यात आले आहे. वादळाचा अनेक उड्डाणांवर परिणाम झाला. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या असून प्रवाशांनी त्यांच्या विमानांच्या स्थितीची माहिती घेऊनच प्रवासाला निघावे, असे आवाहन करण्यात आले आहे.