मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पक्ष्याच्या धडकेने विमानाच्या इंजिनला हवेतच लागली आग, १२२ प्रवाशांची उडाली तारांबळ

पक्ष्याच्या धडकेने विमानाच्या इंजिनला हवेतच लागली आग, १२२ प्रवाशांची उडाली तारांबळ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 15, 2024 07:53 PM IST

Fire in Plane Engine : पक्षाच्या धडकेत विमानाच्या इंजिनला आग लागली. बघता बघता आग विमानाच्या मागील भागापर्यंत पोहोचली. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

Fire in Plane Engine
Fire in Plane Engine

हवेत उड्डाण केल्यानंतर विमानाच्या स्टारबोर्डला पक्षाची धडक बसल्याने इंजिनला आग लागली. टीवे एअरलाईनचे बोइंग ७३७-८०० हे विमान १२२ प्रवाशांना घेऊन निघाले होते. विमानला आग लागवल्याचे पाहून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.सर्व प्रवाशी सुरक्षित असून विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले व सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले गेले. रात्री साडे नऊ वाजता विमान दक्षिण कोरियाच्या इंचियोन विमानतळावर उतरत असताना ही दुर्घटना घडली.


स्थानिक आउटलेट टीबीएस न्यूज डिगने दिलेल्या माहितीनुसार विमान हवेत असतानाच एक पक्षी विमानाच्या स्टारबोर्ड इंजिनला धडकला. यामुळे इंजिनला आग लागली. इंजिनमधून आगीचे लोळ बाहेर येताना पाहून विमानातील प्रवाशांमध्ये खळबळ माजली. विमान वेगात असल्याने इंजिनला लागलेली आग विमानाच्या मागच्या बाजूपर्यंत गेली. वैमानिकांनी प्रवासी व क्रू मेंबर्सच्या सुरक्षेसाठी विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान इंचियोन विमानतळावर उतरणार होते.

विमानाला आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये खळबळ माजली. एका प्रवाशाने माध्यमांशी सांगितले की, माझे हात थरथर कापत होते व माझ्या कुटूंबातील लोकांच्या तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. माझी भीतीने गाळण उडाली होती. मला वाटत नव्हते की, आम्ही सुरक्षित जमिनीवर उतरू.

विमानला आग लागल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विमानातील प्रवाशांनी विमानाचे लँडिंग होतानाचे व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. विमान रन वे वर उतरत असताना विमानातून आगीची लोळ बाहेर येताना दिसत होते.

WhatsApp channel

विभाग