एकबहीण आणि तिच्या भावामधील हृदयस्पर्शी संवादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये दिसते की, फ्लाइट अटेंडेंट (Flight Attendant) बहिणीने आपल्या छोट्या भावाला कसे सरप्राइज दिले जेव्हा तो इंडिगो (IndiGo) च्या ग्राउंड क्रूचा स्टाफ म्हणून विमानात चढत होता.
इंडिगो फ्लाइट अटेंडेंट आणि इंस्टाग्राम यूजर रिया राजेश देवकर यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिचा भाऊ हर्ष याच्यासोबत तिचे काही प्रेमळ क्षण कैद आहेत. तिने क्लिपसोबत लिहिले की, देवकर परिवार ते ६ E परिवारापर्यंत! मला माझ्या छोट्या भावाचा अभिमान आहे. मी तुझ्यावर खुप प्रेम करते, अभिनंदन.''
व्हिडिओ एक टेक्स्ट इंसर्ट दाखवण्यासाठी ओपन होते, त्यामध्ये लिहिले की, एका गौरवान्वित बहिणीचे POV". व्हिडिओमध्ये दिसते की, विमानात प्रवेश करताच रिया हर्षला मिठ्ठी मारते. रियाने इंडिगो फ्लाइट अटेंडेंटचा पोषाख परिधान केला असून हर्ष त्याच एयरलाइनच्या ग्राउंड स्टाफच्या वर्दीत दिसत आहे.
व्हिडिओ पुढे सरकत असतानाच रिया तिच्या खास सरप्राइजचा खुलासा करते जे तिने हर्षसाठी तयार केले आहे. त्याच्या स्वागतासाठी एक नोटही लिहिले आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, हर्ष इंडिगोमध्ये एसोसिएट टेक्निशियन इंजीनियरिंग पदावर नियुक्त झाला आहे.
व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच पोस्ट केला असून आतापर्यंत २.२ मिलियन हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला असून अनेक कमेंटही केले जात आहेत. हर्ष याने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो.