मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Afghanistan floods: अफगाणिस्तानमध्ये पावसाचा कहर, पुरात ३०० हून अधिक जणांचा मृत्यू

Afghanistan floods: अफगाणिस्तानमध्ये पावसाचा कहर, पुरात ३०० हून अधिक जणांचा मृत्यू

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 12, 2024 06:04 PM IST

Afghanistan floods Upadates: अफगाणिस्तानमध्ये आलेल्या पुरात ३०० हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अफगाणिस्तानच्या सामंगन प्रांतातील फिरोज नखचिर जिल्ह्यात ११ मे २०२४ रोजी मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरात ३०० जणांचा मृत्यू झाला.
अफगाणिस्तानच्या सामंगन प्रांतातील फिरोज नखचिर जिल्ह्यात ११ मे २०२४ रोजी मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरात ३०० जणांचा मृत्यू झाला. (AFP)

Afghanistan floods News: अफगाणिस्तानात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून एक हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अन्न संस्थेने शनिवारी दिली.जागतिक अन्न कार्यक्रमाने म्हटले आहे की, गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणिस्तानात मुसळधार पाऊस होत आहे. शेजारच्या तखार प्रांतात सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पुरामुळे ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

तालिबान सरकारचे मुख्य प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले की, "… या भीषण पुरामुळे शेकडोंचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे देशातील बदख्शान, बागलान, घोर आणि हेरात या राज्याला सर्वाधिक फटका बसला आहे.  तसेच नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहेत.

नागरिकांना वाचवण्यासाठी, जखमींना नेण्यासाठी आणि मृतांना बाहेर काढण्यासाठी सरकारने सर्व उपलब्ध संसाधने वापरण्याचे आदेश दिले आहेत. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या हवाई दलाने बागलानमधील लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. तसेच पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आणि १०० जखमींना या भागातील लष्करी रुग्णालयात नेले आहे. तालिबान आणि आंतरराष्ट्रीय घटकांकडून त्वरित मदत आणि दीर्घकालीन नियोजन या दोन्हीची आवश्यकता आहे, असे अफगाणिस्तानातील मानवी हक्कांच्या स्थितीवर संयुक्त राष्ट्रांचे विशेष दूत रिचर्ड बेनेट यांनी म्हटले.

पुरात निष्पाप लोकांचा मृत्यू

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शनिवारी डझनभर लोक बागलाणमधील रुग्णालयाच्या मागे आपल्या प्रियजनांच्या शोधात जमलेले दिसत आहेत. त्यांचे कर्मचारी दफनविधीसाठी मृतदेह तयार करण्यात व्यस्त असताना एका अधिकाऱ्याने त्यांना कबरी खोदण्याचे आदेश दिले.

या वर्षात अफगाणिस्तानमध्ये दुसऱ्यांदा पूर

मिळालेल्या माहितीनुसार, आधीही अफगाणिस्तानमध्ये एप्रिल महिन्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे जवळपास ७० निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. या पुरात सुमारे दोन हजार घरे, तीन मशिदी आणि चार शाळांचे नुकसाान झाले.

IPL_Entry_Point

विभाग