यूपीमधील अमरोहा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच वर्षीय चिमुकलीचा मोबाईलमध्ये कार्टून पाहताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मुलगी आईसोबत मोबाइलवर कार्टून पहात होता. मोबाइल तिच्या हातातून खाली पडला व मुलगी क्षणात गतप्राण झाली. कुटूंबीयांनी तत्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृत्यूचे कारण हार्ट अटॅक मानले जात आहे.
ही घटना कोतवाली परिसरातील हथियाखेडा गावातील आहे. कामिनी असे मृत मुलीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ती आई सोनियासोबत मोबाइलवर कार्टून पाहत होती. त्यावेळी कामिनीच्या हातातून मोबाइल खाली पडला. पहिल्यांदा तिच्या आईला वाटले की, मुलगी मुद्दामहून असे करत आहे. मात्र हलवूनही ती उठत नसल्याचे पाहून तिने हंबरडा फोडला. आसपासचे लोक जमा झाले व त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले.
मृत्यूचे कारण हार्ट अटॅक मानले जात आहे. तिच्यावर शनिवारी सकाळी अंतिम संस्कार केले गेले. कामिनी तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. ३० जानेवारी रोजी तिचा पाचवा वाढदिवस साजरा केला जाणार होता.
तिच्या आईने सांगितले की, मुलगी अंथरुणात बसून मोबाईल पाहत होती. अचानक तिच्या मृत्यूने सर्वजण सुन्न आहेत. मुलगी पूर्णपणे निरोगी होती. सायंकाळच्या सुमारास तिने जेवणही केले होते. डॉक्टरांनी सांगितले की, पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे कारण समोर येणार आहे.
संबंधित बातम्या