मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नववर्षाचा पहिलाच दिवस ठरला ‘काळ’; एकाच कुटूंबातील ५ सदस्यांनी गळफास घेत संपवले जीवन

नववर्षाचा पहिलाच दिवस ठरला ‘काळ’; एकाच कुटूंबातील ५ सदस्यांनी गळफास घेत संपवले जीवन

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 01, 2024 04:01 PM IST

Mass Suicide : पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैशाच्या चणचणीतून एका कुटूंबातील पाच सदस्यांनी आपले आयुष्य संपवले आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री लोक जल्लोष साजरा करत असताना पंजाबमधील जालंधरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहेत. येथील एक संपूर्ण कुटूंबाने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना जालंधरमधील आदमपूर येथे घडली आहे. येथील एका कुटूंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पाच जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाले आहेत. सांगितले जात आहे की, आर्थिक तंगीमुळे कुटूंबाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

मनमोहन सिंह (वय ५५) त्यांची पत्नी सर्बजीत कौर (५०),दोन मुली प्रभजोत उर्फ ज्योति (३२) आणिगुरप्रीत कौर उर्फ गोपी (३१) आणि ज्योती यांची तीन वर्षीय मुलगी अमन असे मृतांचे नाव आहे.

पोलीस तपासात समोर आले आहे की, मनमोहन सिंह यांनी कुटूंबातील चार लोकांची हत्या केली व त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक तपासानुसार हे कुटूंब आर्थिक तंगीचा सामना करत होते. या कारणामुळेच त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. जालंधर ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जावई सासरी आल्यानंतर प्रकार उघडकीस -
ही घटना आदमपूर गावातील डरौली खुर्द येथील आहे. मृत मनमोहन सिंह यांचे जावई सर्बजीत सिंह यांनी सांगितले की, तो सतत सासरी फोन करत होता. मात्र कोणीही फोन उचलत नव्हते. रविवारी रात्री डरौली खुर्द येथे पोहोचला असता समोरचे दृष्य पाहून त्याला धक्का बसला.

घरात चिमुकलीसह ५ सदस्यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्याने शेजाऱ्यांना एकत्र करून पोलिसांना याची माहित दिली. माहिती मिळताच आदमपूर पोलीस टाण्याचे एस.एच.ओ. मनजीत सिंह घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घटनास्थळावरून एक सुसाइड नोट मिळाली आहे.

व्यापारात नुकसान व कर्जामुळे तणावात होतेमनमोहन सिंह -
मनमोहन सिंह पोस्ट ऑफिसमध्ये काम करत होते. पोलिसांनी सांगितले की, सुसाइड नोटमध्ये मनमोहन सिंह यांनी लिहिले आहे की, त्यांनी २००३ मध्ये पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी त्यांनी ५ लाखाचे लोन घेतले होते. यात नुकसान झाल्यानंतर त्यांनी गावातील एका व्यक्तीकडून व्याजाने आणखी पैसे घेतले. याचे व्याज भरता भरता आणखी कर्जात बुडाले.

सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे की, पैशाच्या चणचणीमुळे कुटूंब आत्महत्या करत आहे. यासाठी कुणालाही दोषी समजण्यात येऊन नये. मृतांच्या गळ्यावर रस्सीचे निशाण आहेत. शंका व्यक्त केली जात आहे की, सर्वांना लटकवल्यानंतर मनमोहन सिंह यांनी आत्महत्या केली असावी. प्रकरणाचा तपास सुरू असून फोरेंसिक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.

WhatsApp channel

विभाग