MP Crime News in Marathi : मध्यप्रदेश राज्यात एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. एका महिलेला तालिबानी शिक्षा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये दिसते की, पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेल्या महिलेचे हाते पाच ते सहा लोकांनी पकडले आहेत व एकजण काठीने तिला बडवून काढत आहे.
पीडित महिला त्या लोकांकडे क्षमायाचना करत आहे, मात्र तिच्यावर एकापाठोपाठ एक काठीने हल्ला केला जात आहे. महिलेला खूपच बेदम मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे तेथे उपस्थित असलेल्या लोकांनीही केवळ बघ्याची भूमिका घेतला. त्यांच्यापैकी कोणीच महिलेला वाचवण्यासाठी पुढे आले नाही.
महिलेला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस खडबडून जागी झाली आहे. हा प्रकार धार जिल्ह्यातील टांडा पोलीस ठाणे क्षेत्रात समोर आला आहे. महिलेला झालेल्या मारहाणीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मारहाण होताना महिलेने आरोपींच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तिचे सर्व प्रयत्न असफल झाले. महिलेला वाचवण्याऐवजी लोक तिला होत असलेल्या मारहाणीचा व्हिडिओ बनवू लागले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील आरोपीचे नाव नूर सिंह आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अन्य आरोपींच्या शोधासाठी अनेक पथके गठिक केली असून छापेमारी केली जात आहे.
काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल -
महिलेला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव सरकारवर काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. एमपीचे काँग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची दुरावस्था झाली आहे.
राज्यात महिला सुरक्षित नाहीत. महिलेला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा भाजप सरकारच्या काळात महिला सुरक्षेबाबत गंभीर सवाल उपस्थित केले जात आहेत. महिला अत्याचार प्रकरणात मध्य प्रदेश पहिल्या नंबरवर असल्याची टीका काँग्रेसने केली असून या घटनेची निष्पक्ष तपास करत महिलेला न्याय देण्याची मागणी केली आहे.
महिलेला मारहाण होतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाईसाठी पावले उचलली आहेत. व्हिडिओमधील आरोपींची ओळख पडली असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.
एसपी मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, हे प्रकरण टांडा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील आहे. महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच महिलेला कशामुळे मारहाण झाली, याचा तपास केला जात आहे.