Five lakh jobs via PLI for cellular phone company : देशात मोबाईल फोन उत्पादन वाढवण्यासाठी भारताच्या उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेमुळे देशात तब्बल ५ लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, असा दावा दूरसंचार आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. गुरुवारी पॅजेट इलेक्ट्रॉनिक्सच्या नवीन उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी वैष्णव बोलत होते. वर्षभरात २५ लाख फोन तयार करण्यात येणार आहे. पीएलआय योजनेमुळे मोबाईल उद्योगात वाढीव रोजगार निर्मिती ५ लाख झाली आहे. पुढील पाच वर्षांत ही संख्या वाढेल असा विश्वास देखील वैष्णव यांनी व्यक्त केला.
Dixon Technologiesची उपकंपनी Padget Electronics ने नोएडा येथे २५६ कोटी गुंतवणुकीसह नवीन उत्पादन सुविधा स्थापन केली आहे. यातुन Xiaomi उपकरणांचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पातून स्मार्टफोन आणि फीचरफोन उत्पादित करण्याची क्षमता आहे. या प्रकल्पामुळे ५ हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. फोन निर्मितीसाठी देशाची क्षमता वाढत आहे. डिझाइन आणि घटक उत्पादनाच्या विकासाला हा प्रकल्प फायदेशिर ठरेल असे देखील वैष्णव म्हणाले. या कंपन्यांनी आता मोबाईल फोनचे घटक तयार करून त्याच्या निर्णयातीकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे.
पॅजेट ही कंपनी मोबाईलचे सुटे भाग तयार करणारी महत्वाची कंपनी आहे. या कंपनीने २०२२ मध्ये वाढीव उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण करून PLI योजनेंतर्गत लाभ मिळवला आहे. “भारतातील स्थानिक स्मार्टफोन उत्पादन प्रक्रियेला चालना देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे डिक्सन टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी अध्यक्ष सुनील वाचानी म्हणाले.
मजबूत, जागतिक दर्जाची तंत्रज्ञान निर्मितीसाठी इकोसिस्टम तयार करताना भारतातील स्थानिक स्मार्टफोन उत्पादन परिसंस्थेला चालना देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. पुढील १० महिन्यांत आणखी एक सुविधा सुरू करण्याची आमची तयारी असून या माध्यमातून ५० लाख युनिट्सच्या क्षमतेसह हार्डवेअर उत्पादनावर करण्यावर भर राहणार असल्याचे वाचानी म्हणाले.
PLI योजनेमुळे भारतातील मोबाइल फोन उत्पादकांना अशा वेळी मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे जेव्हा Apple सह ब्रँड्सना चीनवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताला पसंती दिली आहे. या वर्षी १०० अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची वाढ भारतात झाली आहे.