देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका तृतीयपंथीला फाशी, ३ महिन्याच्या चिमुकलीवर केला होता रेप आणि हत्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका तृतीयपंथीला फाशी, ३ महिन्याच्या चिमुकलीवर केला होता रेप आणि हत्या

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका तृतीयपंथीला फाशी, ३ महिन्याच्या चिमुकलीवर केला होता रेप आणि हत्या

Feb 28, 2024 04:50 PM IST

एकाट्रांसजेंडरला फाशी सुनावली असूनदेशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. मुंबईसत्र न्यायालयाच्या न्यायमूर्तीअदिती कदमयांनी हाफैसला सुनावला.

First time in Indian history trasgender gets death punishment
First time in Indian history trasgender gets death punishment

ट्रान्सजेंडर (trasgender) व्यक्तीला न्यायालयाने तीन महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार व हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवत तिला फाशीची शिक्षा सुनावली आहे.  देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असून एका ट्रांसजेंडरला फाशी सुनावली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती अदिती कदम यांनी हा फैसला सुनावला. न्यायमूर्ती अदिती कदम यांनी म्हटले की जन्मठेपचा नियम आहे आणि मृत्यूदंड अपवाद आहे. रेअर ऑफ द रेअरेस्ट गुन्ह्यात मृत्यूदंड मिळतो. मात्र हा गुन्हा जघन्य असा आहे. या घटनेत क्रुरता दाखवली आहे, त्यामुळे हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ बनले आहे. 

२४ वर्षीय तृतीयपंथीयावर र नवजात मुलीचे अपहरण, बलात्कार व हत्येचा खटला सुरू होता. तिने मुंबईतील कफे परेड परिसरात २०२१ मध्ये हा गुन्हा केला होता. ट्रान्सजेंडर व्यक्तीला जेव्हा न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. पीडित मुलीचे आई-वडील व कुटूंबातील अन्य लोक निकालानंतर न्यायालयात पोहोचले. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, न्यायालयात या प्रकरणात वेगाने कार्यवाही झाली. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाने समाधानी आहोत. 

मिळालेल्या माहितीनुसार मुलीच्या जन्मानंतर तृतीयपंथी लोक या कुटूंबाकडे भेटवस्तू मागण्यासाठी गेले होते. जसा सामान्य रिवाज आहे. मात्र कुटूंबाने त्यांना कोणतीही भेटवस्तू किंवा पैसे देण्यास नकार दिला. यावेळी तृतीयपंथीयांचा या कुटूंबासोबत वादही झाला. यामुळे तो चिढून होता. एका दिवशी जेव्हा घरातील लोक झोपले होते तेव्हा तो घरात घुसला व मुलीला उचलून नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला व तिची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला. पॉक्सो कोर्टाच्या न्यायाधीशाने म्हटले की, हा कोल्ड ब्लडेड मर्डर होता. 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर