मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  New parliament: संविधान हॉल, ग्रंथालय, समिती कक्षापासून भोजनालयापर्यंत; नव्या संसद भवनाचा फर्स्ट लूक

New parliament: संविधान हॉल, ग्रंथालय, समिती कक्षापासून भोजनालयापर्यंत; नव्या संसद भवनाचा फर्स्ट लूक

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 26, 2023 06:31 PM IST

New parliament First Look: नुकताच एएनआय वृत्त संस्थने नव्या संसद भवन इमारतीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

New parliament First Look
New parliament First Look

New parliament First Look Video: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नव्या संसद भवन इमारतीचे येत्या २८ मे २०२३ रोजी उद्घाटन होणार आहे. नवीन संसद भवनाच्या इमारतीचे अनेक फोटो सोशल मीडियावर मीडियावर व्हारयल होत आहे. मात्र, ही इमारत आतून कशी दिसते, याबाबत संपूर्ण देशातील जनतेला उस्तुकता लागली होती. याच पार्श्वभूमीवर नव्या संसद भवनाच्या इमारतीचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात इमारतीसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

नुकताच एएनआय वृत्त संस्थेनं नव्या संसद भवनाच्या इमारतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत लोकसभा आणि राजसभा सभागृह दाखवण्यात आले आहेत. या व्हिडिओ अतिशय छान पद्धतीने काढण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहताना आपण नव्या संसद भवनात असल्याचा अनुभव येतो. व्हिडिओच्या सुरुवातील इमारतीचा बाहेरील भागदेखील दाखवण्यात आला आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर २०१८ रोजी संसदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन केले होते. संसदेच्या नव्या इमारतीमध्ये एकावेळी ८८८ खासदार लोकसभा सभागृहात बसू शकतात. तर, राज्यसभा सभागृहात ३०० खासदार एकत्र बसू शकतात. दोन्ही सभागृहाची एकत्रित बैठक घ्यायची ठरल्यास १ हजार २८० खासदार एकत्र बसू शकतील.

WhatsApp channel

विभाग