मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  BMW ने स्कूटरला जोरदार धडक मारून ५० मीटरपर्यंत नेलं फरफटत; VIDEO पाहून लोक संतप्त

BMW ने स्कूटरला जोरदार धडक मारून ५० मीटरपर्यंत नेलं फरफटत; VIDEO पाहून लोक संतप्त

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 04, 2024 09:55 PM IST

Accident Viral Video : एसयूव्हीनेस्कूटरला जवळपास ५० मीटरपर्यंत फरफटत नेले. हीक्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

tamil nadu accident
tamil nadu accident

तामिळनाडू राज्यातील कांचीपुरममध्ये रस्ते अपघातातील एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक बीएमडब्ल्यू एसयूवी कार स्कूटरला फरफटत नेताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्सनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या अपघातात एका ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सनी एसयूव्ही चालकावर टीका केली आहे.

 
तामिलनाडू राज्यातील कांचीपुरम मध्ये एका भरधाव एसयूव्हीने स्कूटरला धडक दिली. यावर दोन लोक प्रवास करत होते. ही घटना शुक्रवारी झाली. मृत बालामुरुगन आपला मित्र रमेशसोबत जात होते. अयंगर कलाम परिसरात विरुद्ध दिशेने आलेल्या एसयूव्हीने स्कूटरला धडक दिली. 

अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एसयूव्ही दुचाकीला फरफटत नेताना दिसत आहे. रिपोर्टनुसार एसयूव्हीने स्कूटरला जवळपास ५० मीटरपर्यंत फरफटत नेले. ही क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या अपघातात गंभीररित्या जखमी बालामुरुगन आणि रमेश यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी बालामुरुगनला मृत घोषित केले, तर रमेशवर उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

WhatsApp channel