मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  rajkot gaming zone fire : राजकोट गेमिंग झोनमधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, आग कशी लागल्याचे कारण आले समोर

rajkot gaming zone fire : राजकोट गेमिंग झोनमधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, आग कशी लागल्याचे कारण आले समोर

May 27, 2024 10:57 AM IST

Rajkot Gaming zone fire cctv footage : राजकोट येथील गेमिंग झोन येथे लागलेल्या आगीचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले आहे. फ्युएल टायर, फायबरग्लास शेड्स आणि थर्माकोल शीट्स गेमिंग झोनमध्ये ठेवण्यात आले होते. यामुळे हा परिसर ज्वलनशील बनला होता.

राजकोट येथील गेमिंग झोन येथे लागलेल्या आगीचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले आहे.
राजकोट येथील गेमिंग झोन येथे लागलेल्या आगीचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले आहे.

Rajkot Gaming zone fire cctv footage: राजकोट येथे गेमिंग झोन येथे लागलेल्या भीषण आगीत २८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात लहान मुलांचा समावेश होता. या आगीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेमुळे टीआरपी गेमिंग झोन हा दुख:च्या वातावरणात बदलला गेला. व्हायरल होत असलेल्या फुटेजमध्ये गेमिंग झोनमध्ये आग कशी लागली हे दिसत आहे. वेल्डिंग करताना आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आहे ?

पीटीआयने ४० सेकंदाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये आग लागली त्या ठिकाणी अनेक ज्वलनशील पदार्थ ठेवण्यात आले असल्याचे दिसत आहे. गेमझोनमध्ये असलेले नागरिक आणि सुरक्षा रक्षक या वस्तूंना आगीपासून दूर नेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तर काही लोक आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आग विझवण्याच्या प्रयत्नात एक व्यक्ती खाली पडतांना देखील दिसत आहे. मात्र काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले.

Pune Porsche accident : पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलले; ससूनच्या दोन बड्या डॉक्टरांना अटक

काही क्षणात आग संपूर्ण गेमिंग झोनमध्ये पसरली

मिळालेल्या माहितीनुसार, गेमिंग झोनमध्ये इंधन, टायर, फायबरग्लास शेड्स आणि धर्मकोल शीट्स ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. या वस्तूंमुळे आगीने उग्र रूप धारण केले. वेल्डिंग सुरू असतांना ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर येथील नागरिक या ज्वलनशील वस्तु बाहेर काढण्यासाठी धावपळ करत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही वेळातच आग संपूर्ण गेमिंग झोनमध्ये पसरली. या ठिकाणी मौजमजेसाठी आलेल्या तब्बल २८ जणांचा या अग्नितांडवात दुर्दैवी मृत्यू झाला.

Malegaon news : मालेगावात माजी महापौरावर गोळीबार! हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी; तीन गोळ्या झाडल्या

न्यायालयाने घेतली दखल

गुजरात हायकोर्टाने 'गेम झोन' मधील आगीच्या घटनेची स्वत:हून दखल घेतली आहे. ही आग प्रथमदर्शनी 'मानवनिर्मित आपत्ती' असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. पेट्रोल, फायबर आणि फायबर ग्लास शीट्स यांसारखे अत्यंत ज्वलनशील पदार्थ 'गेम झोन'मध्ये ठेवण्यात आल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.

दोन लोकांना अटक

'गेम झोन'मध्ये आगीसंबंधीचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी)ही नसल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निसुरक्षा उपकरणे आहेत पण आग आटोक्यात आणण्यासाठी केलेली कारवाई पुरेशी नव्हती, त्यामुळे शनिवारी ही दुर्घटना घडली. राजकोटचे पोलिस उपायुक्त (गुन्हे) पार्थराजसिंग गोहिल यांनी सांगितले की, टीआरपी गेम झोनचे संचालन करणाऱ्या रेसवे एंटरप्रायझेसचा भागीदार युवराज सिंग सोलंकी आणि त्याचे व्यवस्थापक नितीन जैन यांना अटक करण्यात आली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग